पुणे, 06 एप्रिल: पुणे म्हटलं कि सर्वात आधी डोळ्यासमोर जी चित्र येतात त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे चितळेंची बाकरवडी (Chitale Bakarwadi, Pune). चितळेंच्या बाकरवडीला पुण्यात एव वेगळी प्रतिष्ठा आहे. त्याचाच फायदा आता कोरोनाच्या लसीकरणाला (Coronavirus Vaccination Drive) अधिक प्रतिसाद मिळावा म्हणून करून घेतला जात आहे. पुण्यात कोरोनाचं लसीकरण करून घेणाऱ्याला चितळेची बाकरवडी मोफत देण्यात आली. लोकांनी पुढं येऊन लसीकरण करून घ्यावं यासाठी ही शक्कल लढवण्यात आली होती.
मसिआ आणि चितळे ग्रुप यांच्या वतीनं एकत्रितपणे हा उपक्रम राबवला जात आहे. पुण्यातील विविध केंद्रांवर होत असलेल्या कोरोनाच्या लसीकरणानंतर लस घेणाऱ्या प्रत्येकाला चितळेंची बाकरवडी मोफत दिली जात आहे. पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स या मसिआच्या उपक्रमांतर्गत ही योजना राबवली जात आहे. सोमवारी पुण्यातील विविध केंद्रांवर लसीकरण करून घेतलेल्या प्रत्येकाला चितळेंच्या बाकरवडीचे प्रत्येकी 50 ग्रॅमचे पॅकेट मोफत देण्यात आले. एका दिवसांत अशी पाच हजार पाकिटे मोफत वाटण्यात आली आहेत.
Attention all Punekars !! Who all is taking the vaccine shot tomorrow? With help from @sudhirmehtapune and @ppcr_pune , @ChitaleGroup has kept Bakarwadi treats at various centres for those taking the shot! Tweet out if you are the lucky one to get the packet!!! @DeoSahil pic.twitter.com/DQH1nnbe7K
— Indraneel Chitale (@cIndraneel) April 4, 2021
(हे वाचा -कोरोनाबाबत महाराष्ट्राचा सकारात्मक रेकॉर्ड! आतापर्यंत 81 लाख जणांना मिळाली लस)
पुण्यात लसीकरण सुरू असलेल्या विविध केंद्रांवर म्हणजे धानोरीतील स्व. ग्यानबा तुकाराम हॉस्पिटल, येरवड्याचे राजीव गांधी हॉस्पिटल, वडगाव शेरी येथील मिनाताई ठाकरे हॉस्पिटल, नायडू हॉस्पिटल, हडपसरचे अण्णासाहेब मगर हॉस्पिटल याठिकाणी लस घेणाऱ्यांना हे पाकिट वाटप केले जात आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे
(हे वाचा -पुन्हा लॉकडाऊन! या काळात कसा दूर कराल तणाव, या गोष्टी नक्की करतील मदत....)
साधारणपणे लसीकरणानंतर पाणी, चहा किंवा बिस्कीट ऑफर केले जाते. पण आम्ही बाकरवडी देण्याची ही नवी कल्पना शोधली. लोकांनाही ती आवडल्याचं मसिआच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये दुवा बनून लोकांमध्ये जनजागृती पसरवणं हा यामागचा मूळ हेतू असल्याचं सांगण्यात आलं आहे. मसिआनं या उपक्रमांतर्गत कोविडदरम्यान इतरही अनेक प्रकारे मदत केली आहे. व्हेंटिलेटर खरेदी, पीपीई किट यामाध्यमातून रुग्णालयांना मदत करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Covid-19, Food, Motivation, Pune