अमरावती, 20 मे : देशातील विविध भागांमध्ये मजूर अत्यंत बिकट परिस्थितीत प्रवास करीत आहेत. अनेकांना तर पोटभर खायलाही मिळत नाही. कित्येकांचा अशा परिस्थितीत मृत्यूही झाला आहे. यामध्ये आंध्र प्रदेशातून एक मन हेलावणारी बातमी समोर आली आहे.
येथे एका महिला आयपीएस अधिकाऱ्यांनी रात्री जागून प्रवासी मजुरांना जेवण तयार करुन दिलं. राजा कुमारी पुर्ण दिवस ड्यूटी केल्यानंतर घरी जाणार होत्या, तेव्हाच त्यांच्या फोनवर एक मिस्डकॉल आला.
राजा कुमारी म्हणाल्या की, माझ्या मोबाइलवर मिस्डकॉल होता. मी त्या क्रमांकावर पुन्हा कॉल केला. त्यावेळी फोनवरुन एका महिलेने खाण्यासाठी मागितले. तिला आवाज खूप दमलेला येत होता. त्यावेळी मी माझ्या सहकाऱ्यांना काही खाण्याची सोय होऊ शकते का याबाबत विचारलं. त्यावेळी त्यांनी आता काही शक्य होणार नसल्याचं सांगितलं. काही लोकांनी मजुरांना ब्रेड देण्याचा सल्ला दिला. मात्र यातून भूक शमणार नाही, असं राजा कुमारी यांना वाटलं.
यावर त्या म्हणाल्या की, मी लेमन राईन बनविण्याचं ठरवलं. आरोग्यासाठीही हा पदार्थ चांगला आहे. शिवाय तातडीने तयार करता येण्यासारखा आहे. फोनवरुन मदत मागणारी महिला आणि तिच्यासोबत असलेले अनेकजण 700 किमीचा प्रवास करुन आले होते. आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी जेवण तयार केलं आणि रात्री दीड वाजता जेवण घेऊन तेथे पोहोचल्या. त्यांना पोटभरुन खाऊ घातलं. त्या सर्वांना नंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले.
हे वाचा - मुंबईहून परतलेल्या तरुणींचा बिअरसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये गोंधळ
भयंकर! ठाण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारा अभावी घरातच मृत्यू
पुण्यातील धक्कादायक घटना! अन्न-पाण्याविना एका 40 वर्षीय ऊसतोड मजुराचा मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india