• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • सासूनं गरम चपाती वाढली नाही म्हणून संतापला जावई, उचललं 'हे' भयंकर पाऊल

सासूनं गरम चपाती वाढली नाही म्हणून संतापला जावई, उचललं 'हे' भयंकर पाऊल

सोमवारी रात्री उशीरा सुरेश घरी आला. त्याला सासूने जेवण वाढलं. कारण सुरेशची पत्नी झोपी गेली होती. सुरेशने आपल्या सासूला गरम चपाती वाढण्यास सांगितलं.

 • Share this:
  खंडवा, 21 मे: गरम चपाती वाढली नाही, या क्षुल्लक कारणावरुन एका जावयानं आपल्या सासूची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मध्‍य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी सुरेश (वय-35) याला अटक केली आहे. सुरेश याने 55 वर्षीय सासू गजराबाईला बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. खंडव्यापासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या ओंकारेश्वरच्या मंधाता पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बिल्लोरा गावात ही घटना घडली. हेही वाचा... शिवसेना माजी जिल्हा प्रमुखाची निर्घृण हत्या, खुलेआम गोळी झाडून मारेकरी पसार मंधाता पोलिस स्टेशन प्रभारी निरीक्षक जगदीश पटीदार यांनी दिलेली माहिती अशी की, बिल्लोरा येथील जंगलातील पाड्यात मंगळवारीही घटना घडली. आरोपी सुरेश हा धामनोद येथील रहिवासी आहे. तो लग्नानंतर सासरी राहात होता. मृत गजराबाईच्या पतीने सांगितलं की, सोमवारी रात्री उशीरा सुरेश घरी आला. त्याला सासूने जेवण वाढलं. कारण सुरेशची पत्नी झोपी गेली होती. सुरेशने आपल्या सासूला गरम चपाती वाढण्यास सांगितलं. मात्र, एवढ्यासाठी गरम चपाती बनवणं शक्य नव्हतं. गरम चपाती मिळणार नाही, असं गजराबाईनं सुरेशला स्पष्ट सांगितलं. यावरून सुरेश संतापला. त्याने काठीने सासूला बेदम मारहाण केली. त्यातच गजराबाईचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी जावई फरार झाला होता. हेही वाचा...'हिजडा' शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर.., चक्क तृतीयपंथियाने निलेश राणेंना सुनावलं पत्‍नीच्या बचावासाठी धावले नानूराम, पण... प्रभारी पोलिस निरीक्षक जगदीश पटीदार यांनी सांगितलं की, पत्नीची आरोळी ऐकून नानूराम आणि इतर नातेवाईक गजराबाईच्या बचावासाठी धावले. पण तितक्यात तिचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नानूराम यांनी मारेकरी जावईविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी जावयाला अवघ्या 24 तासांत जेरबंद केलं. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. याशिवाय पोलिस नातेवाईकांचीही चौकशी करणार आहेत.
  Published by:Sandip Parolekar
  First published: