मराठी बातम्या /बातम्या /विदेश /उत्तर कोरियात यापुढे लेदर जॅकेटवर बंदी, कारण वाचून होईल हुकूमशाहीची जाणीव

उत्तर कोरियात यापुढे लेदर जॅकेटवर बंदी, कारण वाचून होईल हुकूमशाहीची जाणीव

यापुढे देशात कुणीही (Leather jackets banned in North Korea to stop people from copying Kim Jong) लेदर जॅकेट वापरू नयेत, असे आदेश उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उननं काढले आहेत.

यापुढे देशात कुणीही (Leather jackets banned in North Korea to stop people from copying Kim Jong) लेदर जॅकेट वापरू नयेत, असे आदेश उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उननं काढले आहेत.

यापुढे देशात कुणीही (Leather jackets banned in North Korea to stop people from copying Kim Jong) लेदर जॅकेट वापरू नयेत, असे आदेश उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उननं काढले आहेत.

प्योंगँग, 25 नोव्हेंबर: यापुढे देशात कुणीही (Leather jackets banned in North Korea to stop people from copying Kim Jong) लेदर जॅकेट वापरू नयेत, असे आदेश उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उननं काढले आहेत. उत्तर कोरियात हुकूमशाही असल्यामुळे कधी काय निर्णय़ होईल (Autocratic decisions) आणि जनतेचा नेमका कशाचा भुर्दंड सोसावा लागेल, हे काही सांगता येत नाही. सध्या किम जोंगनं काढलेले नवा फतवा सर्वसामान्यांनासाठी डोकेदुखी ठरला आहे.

काय आहे आदेश?

उत्तर कोरियातील नागरिकांनी यापुढे लेदरचे जॅकेट्स घालू नयेत, असे आदेश किम जोंग उननं दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून लेदर जॅकेट्सच्या मागणीत जोरदार वाढ नोंदवली जात असल्याचं चित्र होतं. यासाठीचा कच्चा माल चीनहून आयात होत असल्यामुळे उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे शाही पेहराव करणं टाळावं, असे आदेश किम जोंगनं दिले आहेत.

हे आहे खरं कारण

चीनवरून होणारी आयात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं कारण पुढं केलं जात असलं, तरी खरं कारण वेगळंच असल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसांपूर्वी किम जोंग उननं एका समारंभात काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं. त्याचे फोटो उत्तर कोरियात प्रचंड गाजले. त्यानंतर अनेक तरुण अशा प्रकारचं जॅकेट घालू लागले. स्वतः किम जोंग घालत असलेल्या पेहरावाचं महत्त्व त्यामुळे कमी होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. लेदरचे वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स घालण्याचा अधिकार हा केवळ हुकूमशहा किम जोंग आणि सरकारमधील काही शाही व्यक्तींनाच असावा, अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांनी हा पेहराव करण्यास मनाई करण्यात आली आहे.

हे वाचा- 11 महिन्याच्या चिमुकलीची स्नो-बोर्डवर कमाल, चालण्याआधीच शिकली बॅलन्सिंग

तरुणांमध्ये नाराजी

लेदर जॅकेट्स हा तरुणांच्या आकर्षणाचा विषय आहे. मात्र ते आता बाजारात उपलब्धच होणार नसल्यामुळे तरुणांमध्ये नाराजी आहे. ज्यांच्याकडे असे जॅकेट्स आहेत, ते यापुढे घालू शकणार नाहीत. त्यामुळे हा आदेश मागे घेण्यात येईल, अशी अपेक्षा सध्या तरुण व्यक्त करत आहेत.

First published:

Tags: Kim jong un, North korea