• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 11 महिन्याच्या चिमुकलीची स्नो-बोर्डवर कमाल, चालण्याआधीच शिकली बॅलन्सिंग; पाहा VIDEO

11 महिन्याच्या चिमुकलीची स्नो-बोर्डवर कमाल, चालण्याआधीच शिकली बॅलन्सिंग; पाहा VIDEO

11 महिन्यांची चिमुकली (Viral video of a girl snowboarding with her father) सराईतपणे स्नो-बोर्डिंग करत असल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

 • Share this:
  बिजिंग, 24 नोव्हेंबर: 11 महिन्यांची चिमुकली (Viral video of a girl snowboarding with her father) सराईतपणे स्नो-बोर्डिंग करत असल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्या वयात मुलांना धड उभंही राहता येत नाही, चालण्याचा ती प्रयत्न करत (Video goes viral on social media) असतात, त्या वयात ही चिमुकली स्नो बोर्डिंग करत असल्याचं पाहून अनेकांनी आश्चर्याचा धक्का बसला आहे. लहानपणापासून मुलांना जे वातावरण मिळतं, त्यात ती तरबेज होतात, असं सांगितलं जातं. या मुलीच्या आईवडिलांना ट्रेकिंगची आवड असल्यामुळे तिला जन्मापासूनच ते ट्रेकिंगला घेऊन जात होते. त्याच वातावरणात राहिल्यामुळे तिलादेखील बॅलन्सिंग करता येऊ (Snowboarding at young age) लागलं आणि वयाच्या मानाने ती फारच लिलया स्नो-बोर्डिंग करू लागली. लहान वयात करते कमाल मूळच्या चिनी असणाऱ्या या मुलीचं नाव आहे वांग युजी. तिचा जन्म होऊन अजून एक वर्षदेखील झालं नाही. मात्र सतत आईवडिलांसोबत ट्रेकिंगला गेल्यामुळे तिलादेखील स्नो बोर्डिंग करता येऊ लागलं आहे. वडिलांच्या मदतीनं ती स्नो बोर्डिंग करते आणि बर्फात खेळण्याचा मनमुराद आनंद लुटते. असा आहे व्हिडिओ स्नो बोर्डिंग करताना तिच्या वडिलांनी तिला पाठीमागून पकडलं आहे आणि मुलगी स्लाईट स्लोप करताना दिसत आहे. वडिलांनी मुलीच्या पाठीला एक  दोरी बांधली आहे आणि पाठीमागून तिला घट्ट पकडलं आहे. वडील तिला पाठीमागून प्रोत्साहन देत आहेत. तू खूपच चांगलं करत आहेस, फक्त पुढं पाहत राहा आणि रस्त्याकडे लक्ष ठेव अशा सूचना ते मुलीला देत आहेत. आपल्या मुलीला अजून दिशांचं ज्ञान नसलं तरी या प्रक्रियेचा ती आनंद लुटत असल्याची प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी Globallink सोबत बातचित करताना दिला आहे. हे वाचा - मोबाइल टॉवरचा वाद; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाने भावावरच रोखली बंदूक? पहिल्यांदाच केलं स्नोबोर्डिंग जेव्हा मुलीनं पहिल्यांदा बर्फ पाहिला, तेव्हा ती फारच एक्साईट झाली आणि आनंदाने ओरडू लागली. तिला पर्यटनाची ही प्रक्रिया फारच आवडली आणि तिनं थेट स्नोबोर्डिंगला सुरवात केल्याची प्रतिक्रिया तिच्या आईनं दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
  Published by:desk news
  First published: