ये दिल मांगे मोअर! किम जोंगचे शास्त्रज्ञांना आदेश, अधिक शक्तीशाली मिसाईल बनवण्याची सूचना
ये दिल मांगे मोअर! किम जोंगचे शास्त्रज्ञांना आदेश, अधिक शक्तीशाली मिसाईल बनवण्याची सूचना
उत्तर कोरियाच्या ताफ्यात याहून अधिक क्षमतेची क्षेपणास्त्रं असावीत आणि मोठ्या संख्येनं त्यांची निर्मिती व्हावी, असा आदेश हुकूमशहा किम जोंग उननं शास्त्रज्ञांना दिला आहे.
सिउल, 12 जानेवारी: आपल्याला अधिक शक्तीशाली (Powerful) आणि प्रभावी (Impactful) मिसाईल्स (Missiles) हवे आहेत, अशी मागणी उत्तर कोरियाचा (North Korea) सर्वेसर्वा किम जोंग उन (Kim Jong Un) याने देशातील शास्त्रज्ञांकडे (Scientists) केली आहे. सोमवारी केलेल्या हायपरसॉनिक मिसाईलची टेस्ट प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यानंतर आपले इरादे अधिकच विस्तारले असल्याचं किम जोंगनं म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे शेजारी देश दक्षिण कोरिया आणि जपान टीका करत असताना आणि अमेरिका डोळे मोठे करत असताना किम जोंग मात्र आपल्याच गुर्मीत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. काय आहे प्रकरण?उत्तर कोरियानं एकाच आठवड्यात लागोपाठ दोन मिसाईलची टेस्ट केली आहे. त्यापैकी सोमवारी हायपरसॉनिक मिसाईलची टेस्ट करण्यात आली. या टेस्टसाठी डागण्यात आलेलं मिसाईल हे जपानच्या समुद्री सीमेच्या अगदी जवळ जाऊन पडलं. त्यामुळे जपान आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांची चिंता वाढली आहे. आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या हायपरसॉनिक मिसाईलची कामगिरी पाहून किम जोंग खूष असून अशाच प्रकारची, किंबहूना यापेक्षा अधिक क्षमतेची क्षेपणास्त्रं आपल्या ताफ्यात असावीत, अशी फर्माईश किम जोंगने शास्त्रज्ञांना केली आहे. जपान आणि दक्षिण कोरियाकडून निषेधउत्तर कोरियाकडून स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.27 मिनिटांनी हे क्षेपणास्त्र समुद्राच्या दिशेनं घोंगावत गेलं आणि समुद्रात पडलं. जमिनीपासून हे क्षेपणास्त्र साधारण 60 किलोमीटर उंच उडालं आणि सुमारे 700 किलोमीटरचा पल्ला पार करून समुद्रात बुडाल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या सैन्य विभागानं दिली आहे. अमेरिकेसोबत आम्हीही उत्तर कोरियाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन असल्याचं दक्षिण कोरियानं म्हटलं आहे.
हे वाचा -
उत्तर कोरियाचा दावाआम्ही आमच्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली असून 700 किलोमीटर दूर असलेल्या टार्गेटचाही अचूक वेध घेण्याची क्षमता आपल्या क्षेपणास्त्रात असल्याचं सिद्ध झालं आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर कोरियाने दिली आहे. त्यांचा हा दावा दक्षिण कोरियाने खोडून काढला असला तरी क्षेपणास्त्रांची सतत होणारी चाचणी हा शेजारी देशांसाठी चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. जपानच्या पंतप्रधानांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.