इस्लामाबाद, 12 जानेवारी: भारताशी (India) सलोख्याचे संबंध (No hostility) ठेवण्यासोबत पुढील 100 वर्षं (100 years) कुठलाही संघर्ष (Conflict) होऊ नये, अशी भूमिका पाकिस्ताननं (Pakistan) घेतली आहे. पाकिस्तानच्या नव्या सुरक्षा धोरणात (New Security Policy) भारताबाबतच्या अनेक गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. भारतासोबत व्यापारी संबंध ठेवण्याची इच्छा असून दोन्ही देशातील संबंध सलोख्याचे आणि शांततेचे राहावेत, या दृष्टीनं धोरण आखलं जाणार आहे.
काय आहे धोरण?
पाकिस्तानमधील वृत्तपत्र ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’नं छापलेल्या बातमीनुसार पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना नव्या नीतीबाबत स्पष्टीकरण दिलं. नव्या 100 पानांच्या या धोरणात भारतासोबतच्या संबंधांबाबत खुलासा कऱण्यात आला आहे. काश्मीर प्रश्नावर तोडगा काढणं आणि त्याविषयीची खलबतं हा एक स्वतंत्र भाग असून ती प्रक्रिया एकीकडे सुरूच राहिल. मात्र त्या प्रक्रियेचा दोन्ही देशांच्या संबंधांवर कुठलाही परिणाम होणार नाही, असं या धोरणात स्पष्ट करण्यात आलं आहे. दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमध्ये व्यापारी संबंध आणि सांस्कृतिक सलोखा टिकून राहावा, अशीच पाकिस्तानची इच्छा असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
शुक्रवारी होणार शुभारंभ
नव्या परराष्ट्र नितीचं औपचारिक उद्घाटन पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते शुक्रवारी केलं जाणार आहे. सध्या तरी भारतातील मोदी सरकारसोबतच्या वाटाघाटी फलदायी ठरतील, अशी अपेक्षा पाकिस्तानला नसल्याचं पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अर्थात, शांतता, सलोखा आणि व्यापारी संबंध याबाबतचे तपशीलच सार्वजनिक करण्यात आले आहेत. कुठलाही देश आपली पूर्ण परराष्ट्र निती कधीच जाहीर करत नाही. त्यातील गोपनिय भाग हा सामान्य जनतेपासून नेहमीच अलिप्त ठेवण्यात येतो.
हे वाचा -
अंब्रेला डॉक्युमेंट
भारतासोबतच्या संबंधांसाठीचं हे एक अंब्रेला डॉक्युमेंट असेल, असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. गेल्या सात वर्षांपासून या परराष्ट्र धोरणावर काम सुरू होतं. 14 वर्षे यावर काम केल्यावर धोरणाचा मसुदा तयार झाला आहे. पाकिस्तानचे तत्कालीन सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांन 2014 साली यावर काम सुरू केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Imran khan, India, India vs Pakistan, Pakistan