Home /News /videsh /

किळसवाणं! तब्बल 30 वर्ष रेस्टॉरंटच्या टॉयलेटमध्ये बनवले जात होते समोसे आणि स्नॅक्स

किळसवाणं! तब्बल 30 वर्ष रेस्टॉरंटच्या टॉयलेटमध्ये बनवले जात होते समोसे आणि स्नॅक्स

सौदी अरेबियाच्या (Saudi Arab) अधिकाऱ्यांनी नुकतेच जेद्दाह ( Jeddah) शहरातील एक रेस्टॉरंट बंद केले आहे. हे रेस्टॉरंट 30 वर्षांहून अधिक काळ आपल्या टॉयलेटमध्ये समोसे आणि इतर स्नॅक्स बनवत असल्याचा आरोप आहे.

    जेद्दाह, 26 एप्रिल : आरोग्य चांगलं राहण्यासाठी खाण्या-पिण्याचे पदार्थ स्वच्छ जागेत आणि आरोग्यदायी पद्धतीनं तयार करणं आवश्यक असतं. घरी बनवलेले पदार्थ बऱ्यापैकी काळजी घेऊनच बनवले जातात. मात्र, हॉटेल, रेस्टॉरंटस यांच्या बाबतीत मनात धाकधूक असते. हल्ली लोकांच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बाहेर खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशा स्थितीत अनेकदा बाहेर खात असलेल्या वस्तूमध्ये अळ्या, कीडे, पाल सापडल्यास लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होतं. याचे फोटो-व्हिडिओही व्हायरल होतात. कारवाईही होते. मात्र, अशा घाणेरड्या वातावरणात तयार होणारे पदार्थ विकणारं रेस्टॉरंट तब्बल 30 वर्ष सुरू होतं आणि लोकांच्या जीवाशी खेळ चालवला होता, हे समजलं तर? सौदी अरेबियाच्या (Saudi Arab) अधिकाऱ्यांनी नुकतंच जेद्दाह ( Jeddah) शहरातील एक रेस्टॉरंट (Restaurant) बंद केलं आहे. हे रेस्टॉरंट 30 वर्षांहून अधिक काळ आपल्या टॉयलेटमध्ये समोसे आणि इतर स्नॅक्स (Samosas and other snacks cooking in the toilet) बनवत असल्याचा आरोप आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्ताचा हवाला देत गल्फ न्यूजने वृत्त दिले आहे की, जेद्दाह नगरपालिकेने निवासी इमारतीतील रेस्टॉरंटवर छापा टाकला होता. येथील अस्वच्छ टॉयलेटमध्ये समोसे व इतर अल्पोपाहाराच्या वस्तू बनवल्या जात असल्याचं आढळून आलं. या रेस्टॉरंटमध्ये विविध प्रकारचे अल्पोपाहाराचे पदार्थ बनवले जात होते आणि त्यातील काहींसाठी स्वच्छतागृहे आणि त्याच्या आजूबाजूच्या अस्वच्छ परिसराचा वापर केला जात होता. याविषयीची गुप्त माहिती देणार्‍याच्या मते, हे 30 वर्षांहून अधिक काळ घडत होते. या वॉशरूममध्ये रेस्टॉरंटमध्ये नाश्ता, जेवण इत्यादी बनवलं जात असे. आणखी वाईट म्हणजे, तेथील मांस आणि चीज अशा अन्नपदार्थांवर किडे आणि अळ्या असल्याचं आढळलं. काही वस्तू दोन वर्षापर्यंत वापरल्या जात होत्या. आता सौदी अरेबियाच्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे. येथे छापे टाकल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, उपाहारगृहात अनेक प्रकारच्या कायद्यांचं खुलेआम उल्लंघन होत आहे. येथील कर्मचाऱ्यांकडे हेल्थ कार्ड नव्हतं. रेस्टॉरंटच्या माध्यमातून निवासी कायद्याचेही पालन करण्यात आले नाही. त्यामुळे रेस्टॉरंट बंद करण्यात आलं आहे. हे वाचा - इथे भयंकर कैदी कारागृहात पाळतात पक्षी, कारण जाणून बसेल आश्चर्याचा धक्का दरम्यान, सौदी अरेबियातील रेस्टॉरंट अस्वच्छ आणि रोगजनक परिस्थितीमुळे बंद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गल्फ न्यूजनुसार, जानेवारीमध्ये जेद्दाहमधील एक प्रसिद्ध शॉरमा रेस्टॉरंट देखील तिथे उंदीर इकडे तिकडे फिरताना आणि मांस खाताना दिसल्यानंतर बंद करण्यात आलं होतं. रेस्टॉरंटची दुरवस्था आणि टॉयलेटमध्ये बनवल्या जाणार्‍या स्नॅक्सबाबत स्थानिक माध्यमांमध्ये अनेक बातम्या येत आहेत. सोशल मीडियावरही लोकांनी या रेस्टॉरंटबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. संतप्त सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांनी रेस्टॉरंटवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सौदी अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता सतत छापे टाकून रेस्टॉरंट्सची माहिती घेतली जात आहे. तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. 43 ठिकाणी धाडी टाकून तत्काळ कारवाई करण्यात आली असून 26 बंद करण्यात आल्याचं पालिकेनं सांगितलं.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Food, Restaurant, Saudi arabia

    पुढील बातम्या