मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

आत्मघाती हल्ल्यात मारला गेला Talibanचा कमांडर मुखलिस, घनींच्या खुर्चीवर बसलेला Photo झाला होता व्हायरल

आत्मघाती हल्ल्यात मारला गेला Talibanचा कमांडर मुखलिस, घनींच्या खुर्चीवर बसलेला Photo झाला होता व्हायरल

अशरफ घनी यांच्या खुर्चीवर बसलेल्या मौलवी हमदुल्ला मुखलिसचे फोटो व्हायरल झाले होते.

अशरफ घनी यांच्या खुर्चीवर बसलेल्या मौलवी हमदुल्ला मुखलिसचे फोटो व्हायरल झाले होते.

अशरफ घनी यांच्या खुर्चीवर बसलेल्या मौलवी हमदुल्ला मुखलिसचे फोटो व्हायरल झाले होते.

  • Published by:  Pooja Vichare

काबूल, 03 नोव्हेंबर: अफगाणिस्तान (Afghanistan Crisis) तालिबानच्या (Taliban) ताब्यात गेल्यानंतर दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कला (Haqanni Network)सर्वात मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी काबूलजवळ लष्करी रुग्णालयात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सिराजुद्दीन हक्कानीचा मुख्य लष्कर रणनितीकार आणि काबूल कमांडर हमदुल्ला मुखलिस ठार झाला. काबूल ताब्यात घेतल्यानंतर हमदुल्ला हा सर्वात पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) यांच्या ऑफिसमध्ये प्रवेश करताना दिसला होता. त्यानंतर अशरफ घनी यांच्या खुर्चीवर बसलेल्या मौलवी हमदुल्ला मुखलिसचे फोटो व्हायरल झाले होते.

हमदुल्ला हा तालिबानच्या विशेष दल बद्री ब्रिगेडचा कमांडरही होता. या ब्रिगेडला काबूलमधील सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. वृत्तसंस्था AFP नं दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तात्काळ कोणत्याही संघटनेनं स्वीकारलेली नाही. ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात धाडसी हल्ला आहे. यापूर्वीच्या हल्ल्यांची जबाबदारी तालिबानचे शत्रू असलेल्या इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी स्वीकारली आहे.

हेही वाचा-  100 कोटी वसुली प्रकरण:  Anil Deshmukh विरोधात ED चा धक्कादायक दावा

अफगाणिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार बिलाल सरवरी यांनी ट्विट केलं की, 'इसिसचे दहशतवादी जेव्हा आपल्या सर्वांत पहिल्या महत्त्वपूर्ण टाग्रेटची हत्या करण्यात यशस्वी झाले आहेत. हमदुल्ला हा तालिबानचा सर्वात करिष्माई नेता होता. यामुळे तालिबानी नेतृत्व निश्चितच हादरले असावं. बिलाल म्हणाले की, येत्या काही दिवसांत आणि महिन्यात घडणाऱ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवावं लागेल.

तालिबाननं सांगितलं - सर्व हल्लेखोर 15 मिनिटांत मारले गेले

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी सांगितलं की, 400 खाटांच्या सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर हा स्फोट झाला. यानंतर इस्लामिक स्टेटच्या बंदुकधारी गटाने हल्ला केला, ज्यातील सर्वजण 15 मिनिटांत मारले गेले. मुजाहिदनं असंही सांगितलं की, तालिबानच्या स्पेशल फोर्स कमांडो टीमला हेलिकॉप्टरनं हॉस्पिटलच्या आवारात सोडण्यात आले.

हेही वाचा- T20 World Cup: नामिबियाच्या ड्रेसिंग रूममध्ये अचानक घुसली पाकिस्तानची टीम, पाहा पुढे काय झालं? VIDEO 

6 हल्लेखोर होते, त्यापैकी दोन तालिबान्यांनी पकडलं

संरक्षण मंत्रालयातील तालिबान अधिकारी हिबतुल्लाह जमाल यांनी सांगितले की, सहा हल्लेखोर आले होते, त्यापैकी दोघांना पकडण्यात आले आहे. किती लोक मरण पावले किंवा किती जखमी झाले हे त्यांनी सांगितले नाही. "आमचे कर्मचारी आणि नागरिकांसह जीवितहानी झाली आहे. मात्र मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झाला नाही, असं जमाल म्हणाले.

First published:

Tags: Afghanistan, Kabul, Taliban