मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

100 कोटी वसुली प्रकरणी ED ची रिमांड नोट, Anil Deshmukh विरोधात केला धक्कादायक दावा

100 कोटी वसुली प्रकरणी ED ची रिमांड नोट, Anil Deshmukh विरोधात केला धक्कादायक दावा

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीनं (ED) अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 03 नोव्हेंबर: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना रात्री ईडीनं (ED) अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी ईडीनं न्यायालयाला सांगितलं की, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे या गुन्ह्यातील कमाईचे "मुख्य लाभार्थी" होते. तसंच देशमुख मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात थेट सहभागी होते, त्यासाठी त्यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला आहे. अनिल देशमुख या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा म्हणून पुढे आलं असल्याचं ED नं आपल्या रिमांड नोटमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणात परकीय षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचंही ईडीने म्हटलं आहे.

हेही वाचा- T20 World Cup: बाबर- रिझवाननं एकाच मॅचमध्ये बनवले अनेक रेकॉर्ड्स, विराट-रोहित पडले मागं

डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत राज्याचे गृहमंत्री असताना देशमुख यांनी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ईडीने केला आहे. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक (नंतर दुसर्‍या गुन्हेगारी प्रकरणात सेवेतून बडतर्फ) सचिन वाझे यांच्यामार्फत वेगवेगळ्या वेळी मुंबई आणि रेस्टॉरंटमधून 4.70 कोटींहून अधिक रक्कम वसूल केली. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं सोमवारी रात्री उशिरा देशमुख यांना अटक केली. ईडीने देशमुख यांना सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पीबी जाधव यांच्यासमोर हजर केले. तेथून त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.

देशमुख महत्त्वाचा दुवा: ईडी

तपास यंत्रणेने आपल्या रिमांड नोटमध्ये म्हटले आहे की, अनिल देशमुख या प्रकरणात महत्त्वाचा दुवा म्हणून समोर आलेत. त्यामुळे या प्रकरणात तार्किक निष्कर्ष काढण्यासाठी तपासासाठी आरोपींची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे. या टप्प्यावर परदेशी षड्यंत्राचा सहभाग नाकारता येत नाही.

सचिन वाझेलाही पैसे दिले होते

त्यात म्हटलं आहे की, वाझेला डिसेंबर 2020 मध्ये 40 लाख रुपये आणि जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 मध्ये 4.30 कोटी रुपये देण्यात आले. ईडीने सांगितले की, 'सचिन वाझेनं बारमालक/व्यवस्थापकांना कळवले होते की गोळा केलेले पैसे 'नंबर 1' आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि समाजसेवा शाखेला जातील. अशा प्रकारे सचिन वाझेनं विविध बारमालक आणि व्यवस्थापकांकडून 4.70 कोटी रुपये वसूल केल्याचं दिसून येत आहे.

अनिल देशमुखांना अटक

ईडीच्या वकिलांनी अनिल देशमुख यांची 14 दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी न्यायालयात केली होती. त्यानंतर दोन्ही बाजुंकडून झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. 100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh arrest) यांना ईडीने अटक केली आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली.

हेही वाचा- High Alert! या 9 राज्यात डेंग्यूचा प्रकोप, आरोग्य मंत्रालयानं उचललं मोठं पाऊल

100 कोटी वसुलीप्रकरणी (Money laundering case) आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.

First published:

Tags: Anil deshmukh