मध्य प्रदेश, 13 फेब्रुवारी: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कटनी जिल्ह्यात (Katni district) शनिवारी संध्याकाळी उशिरा एक मोठी दुर्घटना (major accident) घडली. कटनी जिल्ह्यातील नर्मदा खोरे प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेला भुयारी बोगदा कोसळला. या भुयारी बोगदा कोसळून त्यात अनेक कामगार आत अडकले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून अपघाताची माहिती घेतली. त्याचवेळी, बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळल्याने 9 मजूर अडकल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितलं. यापैकी 5 मजुरांची सुटका करण्यात आली आहे. 4 मजुरांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
#WATCH | Of the 9 labourers trapped, 5 have been rescued after an under-construction tunnel of the Bargi underground canal caved in at Sleemanabad in Katni district of Madhya Pradesh; 4 yet to be rescued. SDERF team at the spot: Administration pic.twitter.com/O0vLdYZj8B
— ANI (@ANI) February 12, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कटनी जिल्ह्यातील स्लीमनाबाद येथील असून, स्लेमनाबाद येथील नर्मदा व्हॅली प्रकल्पांतर्गत नदीच्या उजव्या तीरावर बोगदा बनवण्याचं काम सुरू होतं. नर्मदा नदीवरील बरगी धरण ते बाणसागरपर्यंत भूमिगत बोगद्याच्या कामादरम्यान माती खचल्यानं खाली काम करणारे 9 मजूर अडकले.
प्रशासन और पुलिस की टीम की मौजूदगी में जारी है टनल हादसे में फसे शेष 6 मजदूरों का बचाव कार्य। जिला अस्पताल और मेडिकल कॉलेज तक के लिए ग्रीन कॉरिडोर बनाया गया है। जिससे रेस्क्यू के बाद मजदूरों को जल्द से जल्द अस्पताल तक पहुंचाया जा सके। कलेक्टर @PriyankM_IAS
— Collector Katni (@CollectorKatni) February 12, 2022
-#JansamparkKatni pic.twitter.com/JtydAyMyHd
सुरुवातीला 3 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर मजूर खोलात अडकल्यानं वेळ लागत असल्याचं म्हटलं जात आहे.
जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही घटनास्थळी पोहोचले असून ते बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. बोगद्यात अडकलेल्या 9 मजुरांना बाहेर काढण्यासाठी शाफ्ट बनवून बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्याशी साधला संवाद स्लेमनाबाद येथील घटनेची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेतली आहे. त्यांनी कटनीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर बोलून घटनेची माहिती घेतली. डीएमने सीएम शिवराज यांनाही बचाव कार्याची माहिती दिली. या अपघातात जखमी झालेल्या कामगारांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्या आहेत.