मराठी बातम्या /बातम्या /देश /

तरुणीवर बॉयफ्रेंड आणि मित्रांनीच केला बलात्कार, रात्रभर पडून राहिली बेशुद्ध

तरुणीवर बॉयफ्रेंड आणि मित्रांनीच केला बलात्कार, रात्रभर पडून राहिली बेशुद्ध

चहामधून मादक पदार्थ दिल्यामुळे रात्रभर तरुणी स्थानकावर पडून होती

चहामधून मादक पदार्थ दिल्यामुळे रात्रभर तरुणी स्थानकावर पडून होती

चहामधून मादक पदार्थ दिल्यामुळे रात्रभर तरुणी स्थानकावर पडून होती

  • Published by:  Meenal Gangurde

महराजगंज, 25 फेब्रुवारी : महराजगंज येथील सिसवा बाजार रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत उभी असलेल्या तरुणीला नशा येणारा पदार्थ खायला देऊन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये तब्बल 6 जण सहभागी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 20 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. कोठीभार ठाणे परिसरातील एका गावात राहणाऱ्या या पीडित तरुणीला तिच्या वडिलांनी 20 फेब्रुवारी रोजी सिसवा बाजार रेल्वे स्थानकावर सोडून गेले. पीडित तरुणी पिपराइच येथील आपल्या मामाकडे चालली होती. त्यादरम्यान काही तरुण तिच्याजवळ आले आणि बोलण्याच्या नादात तिला चहा पिण्याचा आग्रह केला. या चहामध्ये त्यांनी मादक पदार्थ टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर तरुणी शुद्धीत नव्हती. अशा परिस्थितीत तिला एका निर्मनुष्य ठिकाणी नेले आणि तिच्यावर  बलात्कार केला.

रात्रभर पीडित तरुणी होती बेशुद्ध

सामूहिक बलात्कारानंतर त्या पीडितेला तेथेच सोडून देण्यात आलं. रात्रभर निर्मनुष्य ठिकाणी तरुणी बेशुद्ध  अवस्थेत पडून होती. सकाळी काही लोकांनी याबाबत तिच्या वडिलांना माहिती दिली. तिच्या वडिलांनी पीडित तरुणीला घरी घेऊन गेले. त्यानंतर पुढले तीन ते चार दिवस ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचे तिचे कुटुंबीय सांगतात. त्यानंतर पीडितेने आणि तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनुसार हे प्रेमप्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमप्रकरणातून हा सामूहिक बलात्काराची घटना घडल्य़ाची शक्यता आहे. यातील पीडितेचे आरोपींपैकी एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ती त्याला भेटण्यासाठी स्थानकावर गेली होती. मात्र त्यादरम्यान त्याच्या मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published:

Tags: Case of rape