मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अबब! रुग्णाच्या पोटातून काढली तब्बल 7 किलोंची किडनी

अबब! रुग्णाच्या पोटातून काढली तब्बल 7 किलोंची किडनी

या रुग्णाला ऑटोसोमल डोमिनेंट पॉलिसिस्टिक हा आजार झाल्याने त्याच्या किडनीचा आकार दिवसेंदिवस वाढत होता

या रुग्णाला ऑटोसोमल डोमिनेंट पॉलिसिस्टिक हा आजार झाल्याने त्याच्या किडनीचा आकार दिवसेंदिवस वाढत होता

या रुग्णाला ऑटोसोमल डोमिनेंट पॉलिसिस्टिक हा आजार झाल्याने त्याच्या किडनीचा आकार दिवसेंदिवस वाढत होता

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 25 फेब्रुवारी : तसं पाहता किडणीचा आकार 120 ते 150 ग्रॅम इतका असतो. मात्र मुंबईतील डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून तब्बल 7 किलोची किडनी काढली आहे. आणि दोन्ही किडन्यांचं वजन 12.8 किलो इतके आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऑटोसोमल डोमिनेंट पॉलिसिस्टिक किडनी डिजिज यामुळे रुग्णावर ही परिस्थिती ओढावली आहे.

एका खासगी रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात राहणारा रोमन (41) किडनी खराब होण्याच्या कारणाने डायलिसीसवर होते. रुग्णाला डायलिसीसपासून सुटका मिळविण्यासाठी ट्रान्सप्लांटची गरज होती. तर सातत्याने आकार वाढत जाणाऱ्या किडनीला काढण्याची गरज निर्माण झाली होती. त्यानुसार डॉक्टरांनी पहिल्यांदा रुग्णाची किडनी काढली आणि त्यानंतर स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटच्या मदतीने नवीन जीवन मिळवून दिले. या रुग्णालयातील किडनी रोग विशेषज्ञ डॉय प्रदीप राव यांनी सांगितले की, रोमन हिच्या आईला एडीपीकेडीची समस्या होती. त्यामुळे रोमनलाही हा त्रास सहन करावा लागला. किडनीचा आकार दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्यामुळे खराब झालेल्या किडनीला काढणे आवश्यक होते. रोमनच्या डाव्या किडनीचे वजन 7 किलो तर उजव्या किडणीचे वजन 5.77 किलो होते. ज्यांच्या आई-वडिलांना एडीपीकेडीची समस्या असते त्यांच्या मुलांना अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागण्याची 50 टक्के शक्यता असते. यापूर्वी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात रुग्णाच्या पोटातून 7.4 किलोची किडनी काढली होती. आतापर्यंत जगातील सर्वात मोठी म्हणजे 9 किलोची किडनी रुग्णाच्या पोटातून काढण्यात आली आहे.

हेही वाचा - तरुणीवर बॉयफ्रेंड आणि मित्रांनीच केला बलात्कार, रात्रभर पडून राहिली बेशुद्ध

घरातच पत्नीसाठी खोदत होते खड्डा, दिवाणखान्यात गाडण्याचा होता प्लॅन, पण...

First published:

Tags: Hospitals, Kidney