जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दादांनी काढला पराभवाचा वचपा, माळेगाव निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलने मारली बाजी

दादांनी काढला पराभवाचा वचपा, माळेगाव निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलने मारली बाजी

दादांनी काढला पराभवाचा वचपा, माळेगाव निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलने मारली बाजी

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निलकंठेश्वर पैनलला 11 जागा मिळाल्या आहेत. तर सहकार बचाव शेतकरी पैनलला 5 जागा विजयी झाल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

बारामती, 25 फेब्रुवारी : बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाले आहेत. यामध्ये एकूण 21 जागांपैकी आतापर्यंत 7 जागांचा निकाल लागला आहे. या निवडणुकांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजिप पवारांच्या पॅनलने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निलकंठेश्वर पैनलला 11 जागा मिळाल्या आहेत. तर सहकार बचाव शेतकरी पैनलला  5 जागा विजयी झाल्या आहेत. सत्ताधारी रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे या गटाला फार मोठा धक्का बसला असून पुढील राखीव पाच जागांसाठी मतमोजणी होत आहे. या सर्व जागांवर राष्ट्रवादीचे निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातून गेलेला हा कारखाना पुन्हा सत्ताकाबीज केला आहे असंच म्हणावं लागेल. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. या निवडणुकीत 21 जागांसाठी या दोन्ही पॅनलसह अन्य 14 अपक्ष असे एकूण 56 उमेदवार रिंगणात आहेत. 23 फेब्रूवारीला या निवडणुकांसाठी मतदान झालं असून 224 तारखेपासून मतमोजणी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी आपला मतदान हक्क बजावला होता. या कारखान्याचे सभासद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यामुळे या कारखान्याच्या नावलौकिक महाराष्ट्र भर आहे. सध्या या कारखान्यावर पवार विरोधी गटाची सत्ता आहे. पण आता ही सत्ता अजित पवारांनी खेचून घेतली आहे. पणदरे गटातील तीनही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पणदरे गटातही राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. माळेगाव गटातील दोन जागा जिंकल्यानंतर पणदरे गटातील तीनही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या असून या गटातून तानाजी कोकरे, केशवराव जगताप, योगेश जगताप हे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनल पणदरे गटामध्ये यावेळी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. माजी उपाध्यक्ष तानाजी कोकरे, मातब्बर उमेदवार केशव जगताप आणि योगेश जगताप या अनुभवी लोकांना या गटातून उतरवले होते. बारामतीत माळेगाव कारखान्याची मतमोजणी करताना दोन मते बाद केल्याने सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख रंजन तावरे आणि अधिकारी यांच्यात वादही झाला होता. मतमोजणी कक्षातच शाब्दिक चकमक झाली होती. जोपर्यंत वातावरण शांत होत नाही तोपर्यंत मतमोजणी बंद करण्यात आली होती. त्यामुळे ही मतमोजणी आज दुपारपर्यंत चालण्याची शक्यता आहे. माळेगांव सहकारी साखर कारखाना निवडणूक. मतमोजणी झालेल्या जागांपैकी विजयी उमेदवार गट नंबर 1 (माळेगांव) संजय काटे- राष्ट्रवादी बाळासाहेब भाऊ तावरे- राष्ट्रवादी रंजन काका तावरे- सहकार बचाव गट नंबर 2 (पणदरे) तानाजी कोकरे- राष्ट्रवादी केशवराव जगताप- राष्ट्रवादी योगेश जगताप- राष्ट्रवादी गट नंबर 3 (सांगवी) सुरेश खलाटे- राष्ट्रवादी*6025 चंद्रराव तावरे- सहकार बचाव 6468 रणजित खलाटे- सहकार बचाव 5842 गट नंबर 4 (निरावागज) मदनराव देवकाते- राष्ट्रवादी*5917 बन्सीलाल आटोळे- राष्ट्रवादी*5910 प्रताप आटोळे- सहकार बचाव 5730 गट नंबर 5 ( बारामती) नितीन सातव -राष्ट्रवादी राजेंद्र ढवाण - राष्ट्रवादी गुलाबराव गावडे- सहकार बचाव निलकंठेश्वर पॅनलच्या पाचही सर्व राखीव जागांवर आघाडीवर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात