इस्रायलने 1967 मध्ये सहा दिवसांच्या युद्धादरम्यान सीरियातील गोलान हाइट्सचा बहुतांश भाग ताब्यात घेतला आणि अजूनही या भागात संघर्षाचे अवशेष आढळू शकतात. इस्रायलच्या YNet न्यूज साइटने सांगितलं की, गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेत कुटुंबातील एका महिला सदस्याने त्यांच्या बॅकपॅकमधून तोफेचा गोळा सोबत घेतला होता आणि तिने एका सुरक्षा अधिकाऱ्याला तो स्वतःच्या सूटकेसमध्ये ठेवता येईल का, असं विचारलं. अधिकाऱ्याने तिला तत्काळ तो गोळा काढून ठेवण्यास सांगितलं. परंतु, हा प्रकार पाहणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाचा गैरसमज झाल्याने त्याने "दहशतवादी, गोळीबार" (terrorists, shooting) असे ओरडण्यास सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली, असं साइटने सांगितलं. इस्रायलच्या कान पब्लिक ब्रॉडकास्टरने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असंख्य लोक ओरडत आणि चेक-इन क्षेत्रातून पळून जाताना दिसले. तर काही जण या गोंधळात जमिनीवर पडले. हे वाचा - संसदेत Adult Film बघत होता खासदार, महिला MP नं पाहताच; पुढे झालं असं की... गोंधळाच्या दरम्यान, युरी नावाचा एका 32 वर्षीय तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करताना जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. 'चेक-इन काउंटरवर पोहोचेपर्यंत मी विमानतळावर एक तास रांगेत थांबलो होतो आणि अचानक आजूबाजूचे लोक पळून जाऊ लागले आणि ते त्यांचे सामान सोडून पळत होते," असं त्यानं YNet ला सांगितलं. "कोणीतरी गोळ्या झाडत आहे, अशी भीती निर्माण झाली होती. मला वाटलं की, मलाही पळून जावं लागेल, म्हणून मी चेक-इनच्या दिशेने पळत गेलो आणि कन्व्हेयर बेल्टला अडखळलो... तिथून सहा मीटर अंतरावर उडून पडलो," असं तो म्हणाला. हे वाचा -अती तिथे माती! पत्ते खेळण्याच्या नादात देशालाच बुडवले, आता आले आर्थिक संकट इस्रायलच्या तेल अवीवच्या बाहेर असलेलं बेन गुरियन विमानतळ जगातील सर्वोच्च सुरक्षा असलेल्या विमानतळांपैकी एक मानलं जातं. टर्मिनल आणि चेक-इन क्षेत्रात पोहोचण्यापूर्वी वाहनं आणि प्रवासी सुरक्षा तपासणीतून जातात. अलीकडच्या काही आठवड्यांत देशभरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या मालिकेनंतर इस्रायल हाय अलर्टवर आहे. त्यात असा प्रसंग घडल्यानं सर्वांची त्रेधातिरपीट उडाली.תיעוד: בהלה בנתב"ג בעקבות חשש מחפץ חשוד. לאחר בדיקות הוכרז על חזרה לשגרה@sharonidan pic.twitter.com/pOMLp3oaeC
— כאן חדשות (@kann_news) April 28, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.