मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Adult Film बघत होता खासदार, संसदेत एकच गोंधळ; महिला खासदार भडकली आणि म्हणाली...

Adult Film बघत होता खासदार, संसदेत एकच गोंधळ; महिला खासदार भडकली आणि म्हणाली...

संसद असो वा विधानसभा, लोकशाहीच्या या सभागृहांमध्ये आपले लोकप्रतिनिधी एडल्ट फिल्म (Adult Film) पाहणं ही काही नवीन बाब नाही.

संसद असो वा विधानसभा, लोकशाहीच्या या सभागृहांमध्ये आपले लोकप्रतिनिधी एडल्ट फिल्म (Adult Film) पाहणं ही काही नवीन बाब नाही.

संसद असो वा विधानसभा, लोकशाहीच्या या सभागृहांमध्ये आपले लोकप्रतिनिधी एडल्ट फिल्म (Adult Film) पाहणं ही काही नवीन बाब नाही.

  • Published by:  Pooja Vichare
ब्रिटन, 28 एप्रिल: जगभरातील संसदेतून मारहाण किंवा हाणामारीसारख्या घटना अनेकदा समोर येतात. मात्र अलीकडेच ब्रिटिश संसदेतून एक अतिशय लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका खासदारावर आरोप आहे की, तो संसदेच्या आत पॉर्न फिल्म पाहत (MP Watching adult movie in Parliament) होता. मात्र, संसद असो वा विधानसभा, लोकशाहीच्या या सभागृहांमध्ये आपले लोकप्रतिनिधी एडल्ट फिल्म (Adult Film) पाहणं ही काही नवीन बाब नाही. अमेरिकेपासून (US) ऑस्ट्रेलियापर्यंतही (Australia) अशी प्रकरणे आढळून आली आहेत. महिला खासदार भडकल्या 'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या (Britain) संसदेतील एक खासदार (MP) आपल्या मोबाईलवर एक एडल्‍ट फिल्म (Adult Movie) पाहत होता. त्यानंतर उपस्थित महिला खासदार संतप्त झाल्या. रिपोर्टनुसार, या घटनेनंतर महिला खासदाराने या प्रकरणाची तक्रार केली. इतकेच नाही तर इतर अनेक खासदारांनीही या प्रकरणावर तीव्र विरोध दर्शवला आहे. याप्रकरणी एका महिला खासदाराने आरोपी खासदाराला खडसावलं आहे. आरोपी खासदाराची ओळख उघड केली नाही या प्रकरणाबाबत अनेक महिला खासदारांनी आवाज उठवला आहे. एका महिला खासदाराने सांगितले की, हे सर्व घडत असताना ती आरोपी खासदाराजवळ बसली होती. कंझर्व्हेटिव्ह पक्षाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मात्र असे कृत्य करणारे खासदार कोण? त्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही. दरम्यान, आरोपी खासदारांनी यापूर्वीही असे कृत्य केल्याचा दावा केला जात आहे. पण नंतर ही गोष्ट लपवण्यात आली. त्याचवेळी याच अहवालानुसार लोकशाहीला लाजवेल असे आरोपी टोरी खासदार (Tory MP)आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की 1834 मध्ये टोरी पक्षापासून फुटून कंझर्व्हेटिव्ह पक्ष अस्तित्वात आला. अशा स्थितीत टोरी पक्षाला ब्रिटनमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्ष म्हणूनही ओळखले जाते. प्रकरणाचा तपास सुरू या प्रकरणी कंझर्व्हेटिव्ह व्हीप ऑफिसचे विधानही समोर आले असून त्यानुसार 'चीफ व्हिप (ख्रिस हीटन हॅरिस) या प्रकरणाची चौकशी करत आहेत. असे वागणे अजिबात सहन होत नाही. या प्रकरणाचा अहवाल येताच आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
First published:

Tags: London

पुढील बातम्या