दिल्ली, 4 सप्टेंबर : न्यूझीलंडमधील (New Zealand) ऑकलंड शहरातल्या सुपर मार्केटमध्ये (Islamic State) शुक्रवारी इस्लामिक स्टेटच्या (ISIS) एका आतंकवाद्याने (Terrorist) चाकु घेऊन बाजारात धुमाकूळ घातला. हातात चाकू घेऊन त्याने जवळपास 6 लोकांला जखमी केेले आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन (Jacinda Ardern) याला हा अतिरेकी हल्ला (Terrorism) असल्याचं म्हटलं आहे.
या हल्यातला आरोपी हा आतंकवादी संगठना इस्लामिक स्टेट (ISIS) चा सदस्य होता. असं त्यांनी म्हटलं आहे. दुपारी 2 वाजून 40 मिनटांंनी हा हल्ला झाला होता. पोलीस या व्यक्तिवर सातत्याने लक्ष ठेऊन होते. त्याने लोकांना मारण्यास सुरुवात करताच पोलिसांनी 60 सेकंदात त्याला गोळी घालून ठार केलं आहे. या घटनेवर पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी दुःख व्यक्त केलं आहे. बाजारात अतिरेक्याच्या हल्यात जखमी झालेल्यांना त्यांनी धीर दिला आहे. जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पंतप्रधानांनी लोकांना सहकार्य आणि मदतीची हाक दिली आहे. त्यामुळे लोकही सद्भावनने मदत करत आहेत.
काबुल एअरपोर्टवर अनेक मुलींची जबरदस्तीनं लग्न
इस्लामिक स्टेट इराक अँड सिरीया ही अतिशय क्रूर अतिरेकी संघटना आहे. या संघटनेचा इराकमध्ये मोठा प्रभाव आहे. जगभरात इस्लामिक राजवट आणणे हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे सातत्याने ही संघटना हल्ले करून लोकांमध्ये भिती निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आता हे हल्ले युरोपात वाढले आहे. याआधी फ्रांस आणि बेल्जियमध्ये अशाच प्रकारचे हल्ले झालेे होते. त्यामुळे मोठा वादही झाला होता. आता न्यूझीलंडमध्ये इस्लामिक स्टेटचा अतिरेकी हल्ला झाल्याने या घटनेचा अनेक देशांनी निषेध केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, Terror attack, Terror group, Terrorism