काबुल, 3 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता (Power) येऊन आता कुठे तीन आठवडे होत आहेत. मात्र आतापर्यंत तालिबानी अत्याचाराच्या हजारो कहाण्या समोर आल्या आहेत. तालिबानच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अनेक तरुणींना (Female) काबुल विमानतळाबाहेर (Kabul Airport) जबरदस्तीनं लग्न (Marriage) करायला लागल्याची बाब एका रिपोर्टमधून समोर आली आहे. एकट्या तरुणीला विमानतळावर जाण्यास मनाई तालिबानी कायद्यानुसार एकट्या तरुणींना विमानतळावर सोडलं जात नव्हतं. जर एखादी महिला कुटुंबासोबत देशाबाहेर जात असेल, तरच त्या महिलांना विमानतळाकडे जाऊ दिलं जात होतं. त्यामुळे देश सोडण्याची इच्छा असणाऱ्या हजारो महिलांना जबरदस्तीनं लग्न करावं लागलं. अनेक महिलांनी पुरुषांना लग्नासाठी तयार केलं. त्यांच्यासोबत लग्न केलं आणि आपण एकच कुटूंब आहोत, असं दाखवत देश सोडला. पैसे देऊन लग्न आपल्या मुलीला किंवा बहिणीला देश सोडणं शक्य व्हावं, यासाठी लग्न न झालेल्या आणि देश सोडण्याच्या तयारीत असलेल्या अनेक पुरुषांना या तरुणी आणि त्यांचे कुटुंबीय गाठत होते. त्यांना लग्न करण्याची विनंती करत होते. अनेकांना तर लग्न करण्यासाठी पैसेदेखील दिले जात होते. काहीही करून तालिबानच्या तावडीतून सुटून बाहेर पडणं, हाच सर्वांचा उद्देश होता. युएईमार्गे युरोप अऩेक तरुणींना युरोपात जायचं होतं. मात्र काबुलमधून थेट विमान नसल्याने त्यांनी अगोदर युएईत जाण्याचं ठरवलं. युएईमार्गे त्यांनी युरोपचा रस्ता धरला. यातील बहुतांश लग्नं ही काबुलपासून सुरु होऊन विमानाने उड्डाण घेताक्षणी संपली. मात्र या लग्नांनीच अनेक तरुणींचा जीव वाचला. तालिबानच्या जुलमी राजवटीतून सुटण्यासाठी नागरिकांना कुठल्या थराला जावं लागलं, याची झलक या उदाहरणातून जगाला दिसली. हे वाचा - मुल्ला बरादर करणार अफगाणिस्तानमधील नव्या सरकारचं नेतृत्त्व: तालिबान सूत्र 15 ऑगस्टला तालिबाननं काबुलवर ताबा मिळवल्यानंतर विमानातून बाहेर पडणारे प्रवासी हे मुख्यत्वे पुरुष होते. त्यानंतर कुटुंबांना बाहेर पडण्यासाठी प्राधान्य देण्यात येत होतं. त्यामुळे अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी अशी अनेक तात्पुरती कुटूंबं तयार झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.