Home /News /videsh /

Boris Johnson यांच्या अडचणी वाढल्या; भारतीय वंशाचे ऋषी सुनक होऊ शकतात ब्रिटनचे पंतप्रधान

Boris Johnson यांच्या अडचणी वाढल्या; भारतीय वंशाचे ऋषी सुनक होऊ शकतात ब्रिटनचे पंतप्रधान

ब्रिटीश मीडियामध्ये असं बोललं जात आहे की, जर बोरिस यांनी पद सोडलं तर, त्यांच्या जागी भारतीय उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई आणि ब्रिटनचे अर्थमंत्री 41 वर्षीय ऋषी सुनक हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात.

पुढे वाचा ...
  लंडन, 3 एप्रिल : भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Indian Origin Rishi Sunak) हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात. ब्रिटनमधील आघाडीची सट्टा कंपनी बेटफेअरनं हे भाकीत केलं आहे, ज्याचं म्हणणं आहे की, पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Prime Minister Boris Johnson) लवकरच राजीनामा देतील आणि त्यांचे भारतीय वंशाचे चॅन्सलर ऋषी सुनक हे 10 डाऊनिंग स्ट्रीट (ब्रिटिश पंतप्रधान कार्यालय) मध्ये पाऊल ठेवण्यासाठी सर्वात पसंतीचे उमेदवार आहेत. जॉन्सन कधीही राजीनामा देऊ शकतात ऑनलाइन सट्टा कंपनी बेटफेअर म्हणते की, 57 वर्षीय जॉन्सनसाठी घड्याळाची टिकटिक सुरू झाली आहे आणि ते कधीही पंतप्रधानपदावरून पायउतार होऊ शकतात. मे 2020 मध्ये देशातील पहिल्या कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान डाउनिंग स्ट्रीटवरील ड्रिंक्स पार्टीच्या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर जॉन्सन यांना केवळ विरोधी पक्षाकडूनच नव्हे तर, त्याच्या स्वतःच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षातूनही दबावाचा सामना करावा लागत आहे. देशातील पहिल्या कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान डाउनिंग स्ट्रीटमध्ये दारू पार्टी केल्याचा यूकेच्या पंतप्रधानांवर आरोप आहे. सुनक यांनी स्वतःला जॉन्सन यांच्यापासून दूर ठेवण्यास सुरुवात केलीये? ऋषी सुनक बुधवारी हाऊस ऑफ कॉमन्सच्या चेंबरमध्ये नव्हते, जेव्हा सुनक यांचे बॉस यांनी जॉन्सन यांनी लॉकडाउन मार्गदर्शक तत्त्वांचं स्पष्ट उल्लंघन केल्याबद्दल "मनापासून माफी" मागितली. यानंतर, 41 वर्षीय सुनक यांच्यावर आरोप करण्यात आला की, संसदेत त्यांची अनुपस्थिती हा जॉन्सन यांच्या अडचणीत सापडलेल्या पक्षाच्या नेत्यापासून स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न होता. मात्र, सुनक यांनी या मुद्द्यावर ट्विट करून अटकळ खोडून काढण्याचा प्रयत्न केला. सुनक यांनी लिहिलं, "मी आज दिवसभर दौऱ्यावर आहे आणि आमच्या #PlanForJobs वर काम करत आहे तसेच ऊर्जा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी खासदारांना भेटत आहे." सुनक, फेब्रुवारी 2020 पासून राजकोषाचे कुलपती (Chancellor of the Exchequer) आहेत. ते म्हणाले, "पंतप्रधानांनी माफी मागणं योग्यच होतं आणि स्यू ग्रे (ब्रिटिश सिव्हिल सर्व्हंट) त्यांची चौकशी करत असताना धीर धरण्याच्या त्यांच्या विनंतीचं मी समर्थन करतो." हे वाचा - 15 वर्षीय भारतीय मुलानं युक्रेनियन निर्वासितांसाठी बनवलं अ‍प, जाणून घ्या याविषयी जॉन्सन यांची चौकशी सुरू, सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात मात्र, या दबावादरम्यान, ब्रिटीश मीडियामध्ये असं बोललं जात आहे की, जर बोरिस यांनी पद सोडलं तर, त्यांच्या जागी भारतीय उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई आणि ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. 'बेटफेअर'चे सॅम रॉसबॉटम यांनी सांगितलं की, जॉन्सन माघार घेतल्यास ऋषी सुनक हे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नागरी सेवक स्यू ग्रे सध्या डाउनिंग स्ट्रीटसह सरकारी क्वार्टरमधील सर्व कथित लॉकडाउन उल्लंघनांची चौकशी करत आहेत. अलीकडच्या आठवड्यात अशाच घटनांबद्दल अनेक खुलासे झाले आहेत, ज्याला जॉन्सन यांनी त्यांच्या कार्यालयाच्या आवारात कामाच्या घटना म्हणून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हे वाचा - मोठी बातमी! UAE मध्ये 'द काश्मिर फाईल्स'वरचे सर्व BAN हटवले; एकही सिन Cut न करता होणार Release
   सट्टेबाज कंपनीच्या आकडेवारीत सुनक आहेत आघाडीवर
  बेटफेअरच्या सॅम रोसबॉटमने 'वेल्स ऑनलाइन'ला सांगितलं, "रिप्लेसमेंटच्या बाबतीत, दीर्घकाळ पसंती मिळालेले ऋषी सुनक अजूनही 15/8 वर बेटिंगमध्ये आघाडीवर आहेत, (परराष्ट्र सचिव) लिझ ट्रस 11/4 आणि (कॅबिनेट मंत्री) मायकेल गोव्ह 6/1 हे पुढील दोन संभाव्य पर्याय आहेत." इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये माजी परराष्ट्र सचिव जेरेमी हंट 8/1 आणि भारतीय वंशाच्या गृह सचिव प्रिती पटेल, आरोग्य सचिव साजिद जाविद आणि 14/1 सह पाचव्या क्रमांकावर कॅबिनेट मंत्री ऑलिव्हर डाउडेन यांचा समावेश आहे." नवीन बेटिंगवरून दिसत आहे की, घड्याळात बोरिस जॉन्सन यांच्यासाठी टिकटिक सुरू झाली आहे," असं कंपनीनं म्हटलं आहे.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Britain, London

  पुढील बातम्या