नवी दिल्ली, 31 मार्च: काश्मीर खोऱ्यात (Kashmir Valley) 1990 मध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांवरच्या (Kashmiri Pandit) अत्याचाराची कहाणी मांडणारा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या देशात प्रचंड चर्चेत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचल्यानंतर काश्मीर फाइल्स आता यूएईकडे निघाला आहे. काही दिवसांपूर्वी यूएईमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी (Vivek Agnihotri) सांगितलं होतं. तसंच या बंदीमागचं कारण समजू शकलं नाही, असंही ते म्हणाले होते. दरम्यान, चित्रपटावरची UAEमधली बंदी अखेर उठवण्यात आली असून, काश्मीर फाइल्स 7 एप्रिल रोजी यूएईमध्ये प्रदर्शित होईल, अशी माहिती विवेक अग्निहोत्रींनी 30 मार्चला ट्विटरवर दिली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ‘मोठा विजय: शेवटी, UAE च्या सेन्सॉरची मंजुरी मिळाली. चित्रपटाला 15+ रेट केलं असून कोणतेही कट न करता सेन्सॉरने मंजुरी दिली. 7 एप्रिल रोजी तिथे काश्मीर फाइल्स चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता सिंगापूर…’ असं ट्वीट विवेक अग्निहोत्री यांनी केलं. दरम्यान, त्यांचं ट्वीट रीट्वीट करून अनुपम खेर यांनीही आनंद व्यक्त केला. NRI शेजाऱ्यामुळे वाढल्या सलमानच्या अडचणी, कोर्टाने फेटाळली अभिनेत्याची याचिका
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला ‘द लल्लनटॉप’शी बोलताना विवेक यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर काही देशांमध्ये बंदी घालण्यात आल्याचा उल्लेख केला होता. ‘यूएईमध्ये चित्रपटावर बंदी आहे. आम्ही हा चित्रपट दाखवू शकत नाही,’ असं त्यांनी सांगितलं होतं. सिंगापूर आणि कतारमध्येही चित्रपटाला मंजुरी दिली नव्हती, असंही त्यांनी सांगितलं होतं.
दुसरीकडे विवेक आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांना ब्रिटिश संसदेने (British Parliament) काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांबद्दल बोलण्यासाठी आमंत्रित केलं आहे. बॉलिवूड हंगामाशी बोलताना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी या वृत्ताला दुजोरा दिला. ‘हे खरं आहे. माझी पत्नी पल्लवी आणि मला ब्रिटिश संसदेत आमंत्रित करण्यात आलं आहे. आम्ही पुढच्या महिन्यात तिथे जाणार आहोत. काश्मिरी पंडितांवरच्या अत्याचाराच्या कहाणीचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा, या उद्देशाने काश्मीर फाइल्स तयार करण्यात आला होता. आमचा तो उद्देश पूर्ण होताना दिसतोय, याचा मला आनंद आहे,’ असं विवेक म्हणाले. Live Video दरम्यान पती मेहुलचा विषय निघताच अभिज्ञा भावे झाली भावुक
दरम्यान, काश्मिरी पंडितांवर अमानुष अत्याचार घडवून आणणाऱ्या दोषी व्यक्तींविरुद्ध कारवाई व्हावी, अशी मागणी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जोर धरू लागली आहे. तेव्हा अनेक काश्मिरी पंडितांची हत्या करणारा दहशतवादी बिट्टा कराटे (Britta Karate) आणि या सगळ्या हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या यासीन मलिकविरुद्ध (Yasin Malik) खटले पुन्हा सुरू करण्याचे संकेत काश्मीरचे पोलीस महासंचालक (Kashmir Police DGP) दिलबाग सिंह यांनी दिले आहेत.