नवी दिल्ली, 31 मार्च : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या महिनाभराहून अधिक काळ युद्ध (Ukraine Russia War) सुरू आहे. युद्धामुळं लाखो लोक निर्वासित (Ukrainian Uefugees) म्हणून इतर देशांमध्ये पोहोचत आहेत. दरम्यान, निर्वासितांच्या मदतीसाठी एका 15 वर्षीय भारतीय मुलाने एक अॅप तयार केले आहे जेणेकरून निर्वासितांना आवश्यक ती मदत मिळू शकेल. हे अॅप Sequoia India चे व्यवस्थापक जी. व्ही. रविशंकर यांचा मुलगा तेजस यानं विकसित केले आहे. चांगल्या सॉफ्टवेअर इंजिनीअरना अॅप बनवायला अनेक महिने लागतात. मात्र, तेजसनं हे अॅप फक्त दोन आठवड्यात तयार केलं. तेजसचं हे अॅप आता गुगल प्लेस्टोअरवरही (Google Playstore) जोडण्यात आलं असून तेजसने स्वतः त्याची लिंक ट्विट केली आहे.
More power to the younger generation! They decide to not debate but act. Keep building @XtremeDevX!
— G V Ravi Shankar (@gvravishankar) March 31, 2022
Please RT to help create impact! https://t.co/EE8wdGfkbQ
सॉफ्टवेअर डेव्हलपर तेजसनं तयार केलेल्या या अॅपमध्ये अनेक खास वैशिष्ट्यं आहेत. यामध्ये निर्वासितांसाठी सर्वात जवळच्या मदत स्थानासाठी संपूर्ण जगाचा नकाशा देण्यात आला आहे. राष्ट्रीय ओळखपत्र-आधारित पडताळणी सुविधा, अन्न, राहण्यासाठी सुरक्षित ठिकाणं आणि जगभरातील औषधं यासारख्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी एक यादी तयार करण्यात आली आहे. तेजसने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, गरजू व्यक्तीला फक्त दोन क्लिकवर मदत मिळू शकते. हे अॅप आणखी 12 भाषांमध्ये काम करतं. तेजसचे वडील जी. व्ही. रविशंकर यांनी त्यांच्या मुलाचं यश ट्विटरवर शेअर केले आणि त्यांच्या मुलाचं कौतुक केलंय. त्यांनी आपल्या मुलाला यापलीकडे काम करत राहण्यास सांगितलं. काही दिवसांपूर्वी तेजसनं गुगल प्लेला आपल्या अॅपला मान्यता देण्याचं आवाहन केलं होतं.