मराठी बातम्या /बातम्या /विदेश /एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची ऑस्ट्रेलियात हत्या, शहरापासून 400 किमी दूर पुरला मृतदेह

एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची ऑस्ट्रेलियात हत्या, शहरापासून 400 किमी दूर पुरला मृतदेह

Murder in Australia: एकतर्फी प्रेमातून (One side love) भारतीय तरुणीची ऑस्ट्रेलियामध्ये हत्या (Indian women murder in Australia) केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीनं तिचा मृतदेह शहरापासून 400 किमी दूर नेवून पुरला आहे.

पुढे वाचा ...

अ‍ॅडिलेड, 10 एप्रिल: एकतर्फी प्रेमातून (One side love) भारतीय तरुणीची ऑस्ट्रेलियामध्ये हत्या (Indian women murder in Australia) केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीनं तिचा मृतदेह शहरापासून 400 किमी दूर नेवून पुरला आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपीही भारतीय आहे. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीसह त्याच्या त्याच्या काका आणि मावशीलाही अटक (Accused Arrest) केली आहे. संबंधित तिघांचीही कसून चौकशी केली जात आहे.

मृत युवतीचं नाव जस्मीन असून ती मुळची पंजाबमधील संगरूर जिल्ह्याच्या नायारणगढ येथील रहिवासी आहे. तर आरोपी युवकाचं नाव तारिकज्योत सिंह असून तो लुधियाना जवळील एका गावातील रहिवासी आहे. मृत युवती अडीच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात नर्सिंगच्या कोर्ससाठी गेली होती. यावेळी ती अ‍ॅडिलेडमध्ये पार्ट टाइम नोकरीही करत होती. ती ज्याठिकाणी नोकरी करत होती, ते दाम्पत्य संबंधित आरोपीचे काका आणि मावशी होते. आरोपीही त्याच ठिकाणी नोकरी करत होता.

नोकरी करत असताना आरोपीची नजर जस्मीनवर पडली. दरम्यानच्या काळात आरोपी तारिकसिंहने जस्मीनला अनेकदा त्रास दिला, तसंच तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मृत जस्मीनने याबाबतची तक्रार पोलिसांना दिली होती. शिवाय तारिक त्रास देत असल्याची माहिती तिने आपल्या घरच्यांनाही दिली होती, अशी माहिती मृत युवतीच्या मामाने दिली आहे. घरी तक्रार दिल्यानंतर आरोपीने तिला त्रास द्यायचं थांबवलं नाही.

(वाचा-महाराष्ट्रातील तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, घातपाताचा संशय)

यादरम्यान जस्मीन अचानक गायब झाली. तिच्याशी काही संपर्कही होऊ शकला नाही. त्यामुळे मृत युवतीच्या नातेवाईकांनी जस्मीनच्या सहकाऱ्याद्वारे ऑस्ट्रेलियन पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सांगितलं. तसंच तिच्या गायब होण्यामागे तारिकचा हात असू शकतो, असा संशयही व्यक्त करण्यात आला. यानंतर ऑस्ट्रेलियन पोलिसांनी आरोपी तारिकसोबतच त्याचा काका आणि मावशीलाही अटक केली आहे. चौकशी दरम्यान आरोपी तारिकने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी 400 किमी दूर पुरलेला मृतदेह ताब्यात घेतला असून हत्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला आहे.

First published:

Tags: Australia, Murder, Panjab