मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्रातील तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, घातपाताचा संशय

महाराष्ट्रातील तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, घातपाताचा संशय

Maharashtrian Couple Found Dead in US: मयत पत्नी गर्भवती होती असल्याची धक्कादायक माहितीही समोर येत आहे. या दाम्पत्याचा खून झाला की आत्महत्या याचा शोध सुरू आहे

बीड, 09 एप्रिल: नोकरीनिमित्त अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अंबाजोगाई येथील तरूण दाम्पत्याचा काल रात्री संशयास्पद मृत्यू (Ambajogai Couple Found Dead in America) झाला. या पती-पत्नीचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या दाम्पत्याने आत्महत्या केली की त्यांचा खून (Suicide or Murder) झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. बालाजी भारत रूद्रवार (वय 32) आणि आरती बालाजी रूद्रवार (वय 30) अशी या मयत पती-पत्नीची नावं आहेत. या घटनेने परिसरात आणि अंबाजोगाईमध्ये देखील त्यांच्या अशा अचानक मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.  विशेष म्हणजे या दाम्पत्याची चार वर्षीय मुलगी मात्र सुखरूप आहे. अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रूद्रवार यांचा बालाजी हा मुलगा आयटी कंपनीतील (IT Job) नोकरीच्या निमित्ताने सहा वर्षापूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील (New Jersey) अर्लिंग्टन भागात कुटूंबासह स्थायिक राहत होता. स्थानिक वेळेनुसार बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत थांबल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळविले . त्यानंतर पोलील घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळी त्यांना घरात बालाजी आणि आरती यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले. (हे वाचा-ACB ची धाड पडताच गॅसवर जाळले 5 लाख, तहसीलदाराचा भ्रष्टाचार उघडकीस) भारतीय वेळेनुसार गुरूवारी 8 एप्रिल रोजी सकाळी 9 वा . तिथल्या पोलिसांनी या घटनेबाबत भारत रुद्रवार यांना फोनवरून माहिती दिली. या घटनेमुळे रूद्रवार कुटूंबीयांना धक्का बसला. मयत आरती या गर्भवती होत्या अशी देखील माहिती समोर येते आहे. मात्र अद्यापही रूद्रवार दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही . शवविच्छेदनानंतरच या दाम्पत्याने आत्महत्या केली किंवा त्यांचा खून झाला हे स्पष्ट होऊ शकणार आहे. यासंदर्भात केज आंबेजोगाई मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला असून बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी देखील या संदर्भात अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाशी यांच्याशी संपर्क केला आहे
First published:

Tags: Beed, Beed news, Murder

पुढील बातम्या