न्यूयॉर्क, 11 नोव्हेंबर : सोशल मीडिया (Social Media) आता सर्वांच्याच सवयीचा भाग बनलाय. सोशल मीडियावर काही वेळ घालवल्याशिवाय अनेकांचा एकही दिवस जात नसेल. काही जण तर तासंतास सोशल मीडियावर काही ना काही कारणाने वेळ घालवत असतात. सोशल मीडिया म्हटलं की फेसबुक (Facebook) अग्रस्थानी आहे. त्यामुळे फेसबुकवर अनेकजण दिवसातले अनेक तास घालवतात. त्यामुळेचे सोशल मीडियाची ही सवय मोडित काढण्यासाठी भारतीय वंशच्या अमेरिकने व्यावसायिकाने एक नामी शक्कल लढवली आहे आणि त्यासाठी तो पैसेही खर्च करत आहे. मनीष सेठी (Manish Sethi) असं या वक्तीचं नाव असून ते Pavlok नावाच्या वीयरबेल डिव्हाईस ब्रँडचे फाऊंडर आहेत. मनीष यांनी एका महिलेला कामावर ठेवले आहे जी प्रत्येक वेळी फेसबुक उघडतात तेव्हा त्यांना कानशिलात लगावते. मनीष यांच्या या अनोख्या कल्पनेने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनाही आश्चर्यचकित केले आहे. मनीष यांनी या महिलेला नोकरी देण्यासाठी अमेरिकेतील एका जाहिरात वेबसाईटवर जाहिरात दिली होती. मनीष या महिलेला तासाला 8 डॉलर म्हणजेच 595 रुपये देतात. मनीषच्या शेजारी बसणे आणि फेसबुक उघडल्यावर त्यांना चापट मारणे हे या महिलेचे काम आहे. मनीष घरी किंवा हॉटेलमध्ये बसले असतानाही महिला त्यांच्यासोबत बसून त्याच्यावर लक्ष ठेवते. महिला पोलिसाचा ‘बाहुबली’ अवतार, बेशुद्ध नागरिकाला घेतलं खांद्यावर; Video पाहून वाटेल अभिमान मनीषने त्यांच्या जाहिरातीत लिहिले होते की, जेव्हाही मी माझा वेळ वाया घालवतो, तेव्हा तुम्हाला माझ्यावर ओरडावे लागेल किंवा गरज पडल्यास मला चापट मारावी लागते. कारा असे मनीषने कामावर घेतलेल्या महिलेचे नाव आहे. मनीषने त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, सामान्य दिवशी माझी प्रोडक्टिव्हिटी 35-40 टक्के असते. परंतु जेव्हा कारा माझ्या शेजारी बसतो तेव्हा माझी प्रोडक्टिव्हिटी 98 टक्क्यांपर्यंत वाढते. मनीष सेठी हे 2012 पासून करत आहेत. आता 9 वर्षांनंतर त्यांच्या या कृतीकडे इलॉन मस्क यांनी केलेल्या ट्वीटमुळे संपूर्ण जगाचे लक्ष गेले आहे. ‘बीफ खाण्यास चुकीचं मानत नव्हते सावरकर, गायीला माता मानण्याच्याही होते विरोधात’ एका व्यक्तीने मनीष सेठीची कथा सांगणारे ट्वीट केले होते, ज्याला उत्तर देताना इलॉन मस्क यांनी इमोजी पोस्ट केला होता. यानंतर स्वत: मनीष सेठी यांनी इलॉन मस्क यांच्या ट्वीटला उत्तर देताना सांगितले की, “मीच ती व्यक्ती आहे. इलॉन मस्क यांच्यामुळे कदाचित आता माझा रीच आणखी वाढेल.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.