मराठी बातम्या /बातम्या /देश /

'बीफ खाण्यास चुकीचं मानत नव्हते सावरकर, गायीला माता मानण्याच्याही होते विरोधात', काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

'बीफ खाण्यास चुकीचं मानत नव्हते सावरकर, गायीला माता मानण्याच्याही होते विरोधात', काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

 माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salaman Khusrshid) यांनी लिहिलेल्या 'सनराइज ओव्हर अयोध्या' (Sunrise Over Ayodhya) या पुस्तकाच्या नुकत्याच झालेल्या प्रकाशनप्रसंगी दिग्विजयसिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चा होत आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 11 नोव्हेंबर: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल किंवा त्यांच्या विचारांबद्दल आजही या ना त्या कारणाने चर्चा होत असते. कधी त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणण्याबद्दल कोणी आक्षेप घेतं, तर कोणी त्यांच्या कथित माफीनाम्यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चिकित्सा करू पाहतं. आता वीर सावरकरांविषयी आणखी एक विधान चर्चेत आलं आहे. काँग्रेस नेते दिग्विजयसिंह (Digvijay Singh) यांनी वीर सावरकरांबाबत एक वक्तव्य केलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salaman Khusrshid) यांनी लिहिलेल्या 'सनराइज ओव्हर अयोध्या' (Sunrise Over Ayodhya) या पुस्तकाच्या नुकत्याच झालेल्या प्रकाशनप्रसंगी दिग्विजयसिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चा होत आहे. 'वीर सावरकरांच्या हिंदुत्व या शब्दाचा सनातन हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. हिंदू ही ओळख दृढ होण्यासाठी त्यांनी हिंदुत्व हा शब्द वापरला होता; मात्र त्यामुळे नागरिकांमध्ये भ्रम निर्माण झाला. सावरकराचं व्यक्तिमत्त्व धार्मिक स्वरूपाचं नव्हतं. गायीला माता मानण्याची काय गरज आहे, असा सवाल ते विचारत. गोमांस अर्थात बीफ खाण्याला ते चुकीचं मानत नव्हते,' असं वक्तव्य दिग्विजयसिंह यांनी केलं आहे. हे वाचा-सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन गदारोळ,ISIS-बोको हरामशी केली हिंदुत्वाची तुलना सलमान खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकात 'द सॅफ्रॉन स्काय' (The Saffron Sky) नावाच्या प्रकरणात हिंदुत्वाविषयी (Hinduism) लिहिलं आहे. 'सध्याच्या युगात हिंदुत्वाचं राजकीय स्वरूप सनातन धर्म (Sanatan Dharma) आणि ऋषी-मुनींच्या प्राचीन हिंदू धर्माला बाजूला सारत असून, हिंदुत्वाचं हे राजकीय रूप इसिस आणि बोको हरामसारख्या जिहादी संघटनांसारखं आहे,' असं त्यात त्यांनी म्हटलं आहे. त्यावरून गदारोळ निर्माण झाला आहे. तसंच, 'आपल्या सार्वजनिक जीवनात दोन्ही समाजात आदानप्रदान होत असतं. त्यात निर्माण झालेला दुरावा कायमचा भरून काढण्याची संधी अयोध्या प्रकरणावरच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं दिली आहे,' असं मतही खुर्शीद यांनी व्यक्त केलं. याच पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात दिग्विजयसिंह म्हणाले, 'सावरकरांनी हिंदूंची ओळख दृढ करण्यासाठी हिंदुत्व हा शब्द रूढ केला. त्यामुळे नागरिकांमध्ये भ्रम निर्माण झाला. वास्तविक त्या हिंदुत्वाचा आणि सनातन हिंदू धर्माचा काहीही संबंध नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचार तंत्रामुळे असं झालं आहे. ते नियंत्रणात आणण्याची कोणाचीही क्षमता नाही. आता तर त्यांच्या हातात सोशल मीडियासारखं शस्त्र आलं आहे. त्यामुळे ते भेदणं कठीण होत चाललं आहे.' हे वाचा-मोठी बातमी! द्वारकामध्ये कोट्यवधींच ड्रग्ज जप्त; ठाण्यातील भाजी विक्रेत्याला अटक 'मला या गोष्टीचं दुःख आहे, की माध्यमंही हिंदुत्वाला हिंदू धर्माशी जोडतात. सावरकर कोणी धार्मिक व्यक्ती नव्हते. उलट, गायीला माता का मानता, असा सवाल ते विचारत आणि गोमांस खाण्याबद्दलही त्यांचा काही आक्षेप नव्हता,' असंही दिग्विजयसिंह यांनी म्हटलं आहे. खुर्शीद यांच्या पुस्तकातल्या मतांमुळे आधीच वाद सुरू झाला आहे. त्यातच दिग्विजयसिंह यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटणार आहे.
First published:

Tags: Congress

पुढील बातम्या