पाककडून भारतीय दूतावासातील 2 अधिकाऱ्यांचा छळ, हात-पाय बांधून मारहाण

पाककडून भारतीय दूतावासातील 2 अधिकाऱ्यांचा छळ, हात-पाय बांधून मारहाण

इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासात काम करणाऱ्या 2 अधिकाऱ्यांचं अपहरण करून 6 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 जून : पाकिस्तानमधील भारतीय दूतावसाच्या दोन कर्मचाऱ्यांसोबत अत्याचार करून ओलिस ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण केलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी सोडल्यानंतर त्यांची प्रकृती खालवल्याचं दिसत होते. या दोन्ही कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यांनी पाणी मागितल्यानंतर त्यांना अशुद्ध पाणी पिण्यासाठी देण्यात आले.

दोन्ही अधिकाऱ्यांच्या मान, चेहरा आणि अंगावर काही व्रण आढळले. वैद्यकीय अहवालात जीवघेणा कोणताही प्रकार करण्यात आला नाही असं समोर आलं. मात्र त्यांना पिण्यासाठी अशुद्ध पाणी आणि टॉर्चर करण्यात आल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

हे वाचा-मोदी सरकारचा एक निर्णय चीनला पडणार भारी, होईल मोठं नुकसान

काय आहे प्रकार?

इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तालयात काम करणारे दोन भारतीय अधिकारी सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हाय-कमिशनकडे जाण्यासाठी त्यांच्या वाहनाने निघाले होते. परंतु ते उच्चायुक्तालयात पोहोचले नाहीत. भारतीय विदेश मंत्रालयाने याबाबत पाकिस्तानचे कार्यकारी उच्चायुक्त यांना याबाबत महिती दिली.

पाकिस्तानमधील माध्यमांच्या म्हणण्यानुसार दोन अधिकाऱ्यांच्या वाहनाच्या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर कथित हिट अँड रन प्रकरणात या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली. या दोन्ही अधिकाऱ्यांची 6 तास कसून चौकशी करण्यात आली. .त्यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांना माहिती काढून घेण्यासाठी बेदम मारहाण कऱण्यात आल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे.

भारतीय मुत्सद्दीला धमकावण्याचा प्रयत्न

यापूर्वी पाकिस्तानातील भारतीय मुत्सद्दीला धमकावण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या आल्या होत्या. आयएसआयच्या काही एजंटनी भारतीय मुत्सद्दीचा पाठलाग केल्याचे वृत्त आहे. भारतीय मुत्सद्दीसोबत झालेल्या या घटनेनंतर भारताने तीव्र विरोध व्यक्त केला.

हे वाचा-कोरोनामुक्त देशात पुन्हा घुसला कोरोना! एका अंत्यविधीनं वाढवली चिंता

हे वाचा-मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही, अखेर पुरलेले मृतदेह बाहेर काढले आणि...

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 16, 2020, 1:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading