मोदी सरकारचा एक निर्णय चीनला पडणार भारी, होईल मोठं नुकसान

मोदी सरकारचा एक निर्णय चीनला पडणार भारी, होईल मोठं नुकसान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक निर्णय चीनसाठी महागात ठरू शकतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जून : जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना देशांमध्ये अनेक गोष्टींवरुन शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे चीनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

मोदी सरकार चीनमधून आयात केलेल्या Aniline Oil वर अँटी डम्पिंग ड्यूटी लावण्याचा विचार करीत आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या शिफारशीनुसार अँटी डम्पिंग ड्युटी (Anti Dumping Duty) लावणार आहे. अनिलिन ऑइलचा उपयोग   औषध, फार्मा आणि डाई उद्योगात केला जातो. भारत दरवर्षी चीनमधून 90 ते 95 केएमटी अनिलिन तेल चीनमधून आयात करतो. देशातील 98 टक्के  Aniline तेल चीनमधून आयात केले जाते. वाणिज्य मंत्रालयाने अनिलिन तेलावर 150.80 डॉलर  - MT अँटी डम्पिंग शुल्काची शिफारस केली आहे.

वस्तुतः गुजरात आणि नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अँड केमिकल्स (जीएनएफसी) (Gujarat Narmada Valley Fertilizers and Chemicals- GNFC) यांनी सरकारकडे तक्रार केली होती की, चीन आणि इतर देशांकडून Aniline तेल आयात केल्याने देशांतर्गत उद्योगांचे नुकसान होत आहे. जीएनएफसीच्या तक्रारीवरून व्यापार मंडळाच्या महासंचालकांनी जानेवारीत हा तपास सुरू केला होता. त्यांनी जवळजवळ सहा महिन्यांकरिता कडक चौकशी केली आणि तपासणीनंतर तब्बल 51 पानांचा अहवाल वाणिज्य मंत्रालयाला सादर केला आहे.

हे वाचा-डिप्रेशन नाही तर 'या' कारणामुळे सुशांतनं केली आत्महत्या? नवी माहिती आली समोर

सुशांतच्या आत्महत्येचं कारण आर्थिक परिस्थिती नाही, बहिणीनं केला मोठा खुलासा

 

First published: June 15, 2020, 3:06 PM IST

ताज्या बातम्या