कोरोनामुक्त झालेल्या ‘या’ देशात पुन्हा घुसला कोरोना! 24 दिवसांनंतर एका अंत्यविधीनं वाढवली चिंता

कोरोनामुक्त झालेल्या ‘या’ देशात पुन्हा घुसला कोरोना! 24 दिवसांनंतर एका अंत्यविधीनं वाढवली चिंता

लॉकडाऊनमध्ये सूट दिल्याचा परिणाम काही देशांना भोगावा लागत आहे. यातच एका कोरोनामुक्त झालेल्या देशात पु्न्हा या विषाणूनं शिरकाव केला आहे.

  • Share this:

वेलिंग्टन 16 जून : एकीकडे जगातील सर्व देश जवळजवळ लॉकडाऊनमध्ये आहे. यातच काही देश कोरोनामुक्तही झाले आहे. त्यामुळं या देशांनी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. मात्र याचा परिणाम या देशांना भोगावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोना घुसला आहे. तब्बल 24 दिवसांनी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की दोन लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. हे दोन दोघं नुकतेच ब्रिटनहून परत आले होते आणि दोघे एकमेकांशी संबंधित आहेत. दोघंही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ब्रिटनला गेले होते. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर त्यांना परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र वेलिंग्टनला परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

वाचा-24 तासांत देशात 10667 नवीन रुग्ण, तरी महाराष्ट्रातून आली दिलासादायक आकडेवारी

मुख्य म्हणजे 8 जून रोजी न्यूझीलंडने देश कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काही प्रमाणात निर्बंध हटवण्यात आले. मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासाला अद्याप बंदी आहे. केवळ नागरिक आणि आवश्यक कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी आहे.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डेने यांनी 8 जून रोजी शेवटचा कोरोना रुग्ण निरोगी झाला असल्याचं सांगितले होतं. तसेच, जेसिंडा यांनी यावेळी देशातील लॉकडाऊन हटवण्याबाबत तसेच काही प्रमाणात सूट देण्याबाबत घोषणा केली आणि न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याचं जाहीर केलं होतं.

वाचा-कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन? महाराष्ट्रातील सिरो सर्व्हेचा रिपोर्ट जाहीर

मात्र आता पुन्हा कोरोनानं शिरकाव केल्यामुळं चिंता वाढली आहे. न्यूझीलंडची लोकसंख्या 49 लाखांच्या आसपास आहे. मात्र पहिल्यापासूनच त्यांनी कडक नियम लावले. न्यूझीलंडमध्ये 28 फेब्रुवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर एकूण 1504 कोरोना रुग्ण सापडले. तर, 22 जणांचा मृत्यू झाला. मात्र मार्चपासून देशातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या. याशिवाय लॉकडाऊनच्या नियमांचेही काटेकोरपणे पालन करण्यात आले. मात्र तब्बल 24 दिवसांनी आता पुन्हा कोरोनानं देशात शिरकाव केल्यानं सर्वांची चिंता वाढली आहे.

वाचा-डॉक्टरांनी पीपीई सूटवर लावले आपले फोटो; कारण वाचून तुम्हीही कराल सॅल्युट

संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 16, 2020, 10:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading