Home /News /videsh /

भयंकर! मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही, अखेर 3 वर्षांपूर्वी पुरलेले मृतदेह बाहेर काढले आणि...

भयंकर! मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही, अखेर 3 वर्षांपूर्वी पुरलेले मृतदेह बाहेर काढले आणि...

सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे तर ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर. ब्राझीलमध्ये मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

    साओ पाउलो, 14 जून : जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत. सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे तर ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर. ब्राझीलमध्ये मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या देशात एवढी भयंकर परिस्थिती आहे की, मृतांना दफन करण्यासाठी जागा शिल्लक नाही आहे. साधा ताप म्हणून राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी कोरोनाची तुलना केली होती. आता याच कोरोनानं 42 हजार 270 लोकांचा जीव घेतला आहे. ब्राझीलमध्ये सध्या 8 लाख 50 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. जूने मृतदेह काढले जात आहेत बाहेर साओ पाउलो येथील पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, नवीन मृतांना पुरण्यासाठी जागा शिल्लक नाही आहे. यासाठी 3 वर्षांपूर्वी पुरलेल्या मृतदेहांचे अवशेष बाहेर काढले जात आहेत. या जागी पुन्हा खोदून नव्यानं मृतदेह पुरले जात आहेत. जून्या मृतदेहांचे अवशेष एका प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवण्यात आले आहेत. वाचा-कोविड हॉस्पिटलमध्ये शिरलं पूराचं पाणी, समोर आला अंगावर काटा उभा करणारा VIDEO राष्ट्रपतींनी लपवला मृतांचा आकडा फॉक्स न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार विला फॉर्मोसा कब्रिस्तानमध्ये एप्रिलमध्ये 1654 लोकांना दफन करण्यात आलं. ही संख्या मार्चपेक्षा जास्त होती. मे आणि जूनमध्ये देशातील मृतांचा आकडा आणखी वाढला, मात्र ही आकडेवारी लपवण्यात आली. तज्ज्ञांच्या मते ब्राझीलमधील दिलेला मृतांचा आकडा खोटा आहे. वाचा-लॉकडाऊनमध्ये अभिनेत्रीच्या घरात दिसलं भूत? VIDEO शेअर करून सांगितलं सत्य कब्रिस्तानमध्ये काम वाढलं विला फॉर्मोसामध्ये मृतदेहांना पुरण्याचे काम करणारे एडनील्सन कोस्टा यांनी सांगितले की, "कोरोनाच्या संकटात काम खूप वाढलं आहे. देशाची परिस्थिती खूप वाईट आहे. दिवस-रात्र मृतदेह पुरण्याचे काम करावे लागते. मात्र अद्यापही लोकं गांभीर्यानं पाहत नाही आहेत". अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वात जास्त रुग्ण आहेत. मात्र राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी कोरोना हा सामान्य आजार असल्याचं मत व्यक्त केलं होतं. वाचा-अंत्यसंस्कारानंतर आला मृताचा रिपोर्ट, 19 जणं कोरोना पॉझिटिव्ह; 350 क्वारंटाईन संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या