Home /News /videsh /

भारतात 2022 पर्यंत 100 कोटी कोरोना लसीच्या डोसचं उत्पादन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

भारतात 2022 पर्यंत 100 कोटी कोरोना लसीच्या डोसचं उत्पादन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

Corona Vaccine: 2022 पर्यंत भारतात किमान 100 कोटी कोविड लस (Covid Vaccine) डोसचं उत्पादन केलं जाणार असून हे काम सध्या ट्रॅकवर आहे.

    वॉश्गिंटन, 23 सप्टेंबर: अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी भारतातील कोविड लसीसंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, क्वाड (Quad पार्टनरशिप अंतर्गत 2022 पर्यंत भारतात किमान 100 कोटी कोविड लस (Covid Vaccine) डोसचं उत्पादन केलं जाणार असून हे काम सध्या ट्रॅकवर आहे. जो बायडेन म्हणाले की, यावेळी कोविड -19 ला रोखण्यासाठी एकत्र काम करण्यापेक्षा आणखी काही महत्त्वाचं नाही. त्यामुळे भविष्यात या साथीला सामोरे जाण्यासाठी जग अधिक चांगले तयार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी डिजिटल माध्यमातून आयोजित केलेल्या ग्लोबल समिट टू एंड कोविड -19 कॉन्फरन्समध्ये सांगितलं की, अमेरिका आणि त्याचे आंतरराष्ट्रीय भागीदार जगातील इतर देशांमध्ये लसीचे उत्पादन वेगाने वाढवण्यासाठी काम करत आहेत. IPL 2021: दिल्लीच्या बॉलरनं टाकला सर्वात फास्ट बॉल, रॉकेटच्या वेगानं केली हैदराबादची चाळण  यावेळी बायडेन म्हणाले की, उदाहरणार्थ, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासह आमची क्वाड भागीदारी जागतिक पुरवठा वाढवण्यासाठी 2022 च्या अखेरीस भारतात किमान 100 कोटी लस डोस तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही दक्षिण आफ्रिकेत लस उत्पादनासाठी निधी प्रदान करत असून उत्पादन बळकट करण्यास मदत करत आहोत. पुढच्या वर्षापर्यत दक्षिण आफ्रिका आणि आफ्रिकेसाठी जॉन्सन अँड जॉन्सनचे 500 मिलियनहून अधिक डोसचं उत्पादन होण्याची शक्यता आहे. या क्वाडमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे, अशी माहितीही बायडेन यांनी दिली. आज 'या' राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, जाणून घ्या तुमच्या राज्यात कसं आहे Weather पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तीन दिवसीय अमेरिका दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी आपल्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले (PM Modi Arrives in Washington to Attend Quad) आहेत. वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदी यांचं जोरदार स्वागत झाल्याचं पाहायला मिळालं. विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अनेक अधिकारी पोहोचले होते. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधूही विमानतळावर उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या आगमनाच्या आनंदात भारतीय समुदायातील 100 हून अधिक लोक विमानतळावर पोहोचले होते(Indian-Americans Welcome PM Modi in Washington). KBC 13: ‘देवाशी कोण बोलतं...’ रोहित शर्माला पाहताच फॅन झाला भावुक! VIDEO या दौऱ्यावर, पीएम मोदी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करतील आणि क्वाड देशांच्या नेत्यांसोबत बैठक घेतील. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पीएम मोदी वॉशिंग्टनला पोहोचताच भारतीय समुदायाच्या लोकांनी घोषणाबाजी सुरू केली. विशेष गोष्ट म्हणजे पाऊस असूनही भारतीय-अमेरिकन पंतप्रधान मोदींची वाट पाहत राहिले. या लोकांना भेटण्यासाठी पीएम मोदी खास त्यांच्या कारमधून खाली उतरले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या