• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Weather Forecast: दिल्ली, मध्यप्रदेशसह या तीन राज्यात मुसळधार पाऊस, जाणून घ्या महाराष्ट्रातले अपडेट

Weather Forecast: दिल्ली, मध्यप्रदेशसह या तीन राज्यात मुसळधार पाऊस, जाणून घ्या महाराष्ट्रातले अपडेट

Weather Updates: देशातल्या हवामानासंदर्भातली बातमी समोर आली आहे. देशातल्या अनेक भागात पाऊस सुरु आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: देशातल्या हवामानासंदर्भातली (Weather Update)  बातमी समोर आली आहे. देशातल्या अनेक भागात पाऊस (Rain Update)  सुरु आहे. देशातल्या तीन राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस राजस्थान (Rajasthan), मध्य प्रदेश (MP)आणि गुजरात (Gujarat) मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यानं (IMD) हा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय काही राज्यांमध्ये पावसाची नवीन चक्र सुरू होण्याची शक्यता आहे. विभागाने राजधानी दिल्लीत गुरुवारी हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. असे म्हटलं जात आहे की, राजधानी दिल्लीमध्ये यंदाच्या पावसाळ्यात इतका पाऊस होण्याची ही दुसरी वेळ आहे. दिल्लीमध्ये हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे, ज्या अंतर्गत मध्यम पाऊस पडू शकतो. सुसाट! भारत देश पुन्हा एकदा कोरोना लसीकरणात सुपरफास्ट आयएमडीने बुधवारी जारी केलेल्या अंदाजानुसार, 23 ते 26 सप्टेंबर दरम्यान उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 23 ते 24 सप्टेंबर दरम्यान पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो. 22 सप्टेंबरपासून पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पावसाच्या हलक्या सरी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, ओडिशामध्ये 25 सप्टेंबरपासून आणि पश्चिम बंगालमध्ये 26 सप्टेंबरपासून पावसाची नवीन चक्र (आवर्तन) सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्यात कसा असेल पाऊस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरुच आहे. आज येत्या 48 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातमध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार (Heavy rainfall) पावसाची शक्यता आहे. 24 आणि 25 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे पाऊस पडत राहणार आहे, अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आली आहे. KBC 13: ‘देवाशी कोण बोलतं...’ रोहित शर्माला पाहताच फॅन झाला भावुक! VIDEO राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस (Rain) आता पुन्हा जोरदार पुनरागमन करणार आहे. राज्यात येत्या 25 तारखेपर्यंत जोरदार पाऊस (Heavy rainfall) पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता (IMD predicts Heavy to Very Heavy Rainfall) आहे. आज सांगली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हे जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हे चार जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 25 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा तर कोकण विभागासह मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: