Home /News /sport /

KBC 13: ‘देवाशी कोण बोलतं...’ रोहित शर्माला पाहताच फॅन झाला भावुक! VIDEO

KBC 13: ‘देवाशी कोण बोलतं...’ रोहित शर्माला पाहताच फॅन झाला भावुक! VIDEO

अनुभवी ओपनिंग बॅटर रोहित शर्माचा (Rohit Sharma) जगातील प्रमुख क्रिकेटपटूंमध्ये समावेश होतो. त्याचे जगभर अनेक फॅन्स आहेत. असाच एक फॅन रोहितला पाहताच चांगलाच भावुक झाला होता. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Video Viral) होत आहे.

    मुंबई, 23 सप्टेंबर : अनुभवी ओपनिंग बॅटर रोहित शर्माचा (Rohit Sharma) जगातील प्रमुख क्रिकेटपटूंमध्ये समावेश होतो. त्याचे जगभर अनेक फॅन्स आहेत. क्रिकेटच्या मैदानात अनेक रेकॉर्ड नावावर असलेल्या रोहित शर्माची ‘हिटमॅन’ अशी ओळख आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट असलेल्या कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) कार्यक्रमातही रोहित शर्माचा एक जबरदस्त फॅन पाहयला मिळणार आहे. सोनी टीव्हीनं केबीसीच्या या भागाचा एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये क्रिकेट आणि रोहित शर्माचे फॅन असलेले प्रांशू नावाचे स्पर्धक सहभागी झाले होते. प्रांशू यांच्या पाकिटातही रोहितचा फोटो असतो. त्यांच्यासाठी रोहित शर्मा हा देव आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांना रोहित आणि त्यांची प्रेयसी यामध्ये एकाची निवड करायला सांगितलं. त्यावेळी त्यांनी हा 7 कोटींपेक्षाही अवघड प्रश्न असल्याचं उत्तर दिलं. प्रांशू यांचं हे रोहितप्रेम पाहता अमिताभ बच्चन यांनी रोहित शर्माला व्हिडीओ कॉल लावला. त्यावेळी व्हिडीओ स्क्रीनवर रोहितला पाहताच प्रांशू चांगलेच भावुक झाले होते. IPL 2021, MI vs KKR : रोहित-हार्दिक कोलकात्याविरुद्ध खेळणार का नाही? मोठी Update आता रोहित शर्मा तुमच्या समोर आहे, तर त्याच्याशी बोला असं अमिताभ यांनी सांगताच प्रांशू यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे जमले नाही. त्यांनी यावेळी ‘सर, देवाशी कोण बोलतं?’ असा प्रश्न अमिताभ बच्चन यांना विचारला. सोनी टीव्ही नेटवर्कनं या प्रसंगाचा एक टिझर शेअर केला आहे. हा टिझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 34 वर्षांचा रोहित शर्मा सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेसाठी यूएईमध्ये आहे. रोहितच्या कॅप्टनसीमध्येच मुंबई इंडियन्सनं आजवर 5 वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद जिंकले आहे. मुंबई इंडियन्सची या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सुरुवात खराब झाली आहे. पहिल्या लढतीच त्यांचा चेन्नई सुपर किंग्सनं पराभव केला होता. या मॅचमध्ये रोहित पूर्ण फिट नसल्यानं खेळू शकला नव्हता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, KBC, Rohit sharma

    पुढील बातम्या