दुबई, 23 सप्टेंबर : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) या बुधवारी झालेल्या मॅचमध्ये एक नवा रेकॉर्ड झाला आहे. या मॅचमध्ये दिल्लीचा फास्ट बॉलर एनरिक नॉर्कियानं (Anrich Nortje) या सिझनमधील सर्वात फास्ट बॉल टाकला. विशेष म्हणजे त्यानं पुढच्याच ओव्हरमध्ये आणखी एक फास्ट बॉल टाकत आपलाच रेकॉर्ड मोडला. नॉर्कियाच्या वेगवान स्पेलमुळे हैदराबादची इनिंग सुरुवातीचा अडखळली, जी शेवटपर्यंत सावरलीच नाही.
नॉर्कियानं दिल्लीकडून पहिली ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये त्यानं 150.1 किलोमीटर प्रती तास वेगानं बॉल टाकला. जो या सिझनमधील सर्वात फास्ट बॉल ठरला. त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये त्यानं यापेक्षा देखील वेगानं बॉल टाकला. त्याच्या बॉलचा वेग 151.7 किलोमीटर प्रती तास इतका होता. जो या आयपीएलच्या सिझनमधील सर्वात फास्ट बॉल आहे. यापूर्वी दिल्लीच्याच कागिसो रबाडानं 148.73 किलोमीटर वेगानं या सिझनमधील सर्वात फास्ट बॉल टाकला होता. रबाडानं ही कामगिरी पहिल्या सिझनमध्ये केली होती.
नॉर्कियानं पहिल्याच ओव्हरमध्ये दिल्लीला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानं हैदराबादचा अनुभवी बॅट्समन डेव्हिड वॉर्नरला (David Warner) शून्य रनवर आऊट केलं. एप्रिल 2016 नंतर वॉर्नर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये शून्यावर आऊट झाला. त्यानंतर त्यानं पुढच्या स्पेलमध्ये केदार जाधवला 3 रनवर आऊट केलं. नॉर्कियानं या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये फक्त 12 रन देत 2 विकेट्स घेतल्या.
दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट!
आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात सर्वात फास्ट बॉल टाकण्याचा रेकॉर्डही नॉर्कियाच्या नावावर आहे. त्यानं मागील सिझनमध्ये 156.22 किलोमीटर प्रती तास वेगानं बॉल टाकला होता. त्याचप्रमाणे दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवरही तोच आहे. त्यानं 155.21 आणि 154.74 या वेगानं बॉल टाकला आहे. नॉर्कियाची या सिझनमधील ही पहिलीच मॅच होती. पहिल्याच मॅचमध्ये त्यानं या सिझनमधील रेकॉर्ड केला आहे.
This is the first match of Nortje in #IPL2021 and he has bowled the fastest top 8 balls in this season. Crazy. pic.twitter.com/ALf9kgRNpQ
— Johns. (@CricCrazyJohns) September 22, 2021
दिल्ली टॉपवर
दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सनं मोठा पराभव केला आहे. हैदराबादविरुद्धच्या या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्स पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) पहिल्या क्रमांकावर गेली आहे. दिल्लीने 9 पैकी 7 सामने जिंकले असून फक्त 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दिल्लीच्या खात्यात आता 14 पॉईंट्स आहेत, त्यामुळे त्यांचं प्ले-ऑफमधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. उरलेल्या 5 पैकी दिल्लीला आता फक्त 1 मॅच जिंकायची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, IPL 2021