जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / सरकार पडण्याच्या संकटात पंतप्रधान इम्रान यांना आणखी एक झटका, निवडणूक आयोगानं केली ही कारवाई

सरकार पडण्याच्या संकटात पंतप्रधान इम्रान यांना आणखी एक झटका, निवडणूक आयोगानं केली ही कारवाई

सरकार पडण्याच्या संकटात पंतप्रधान इम्रान यांना आणखी एक झटका, निवडणूक आयोगानं केली ही कारवाई

इम्रान यांच्याशिवाय आणखी 5 जणांवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. या लोकांमध्ये परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी, केंद्रीय दळणवळण मंत्री मुराद सईद, खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान, प्रांतीय मंत्री डॉ. अमजद अली आणि मोहिबुल्ला यांचा समावेश आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

इस्लामाबाद, 23 मार्च : पाकिस्तान सरकारवर सध्या संकटाचे ढग आहेत. अशा परिस्थितीत इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) पंतप्रधानपदाची खुर्ची वाचवण्यासाठी धडपडत आहेत. यातच पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं (Election Commission of Pakistan) त्यांना मोठा झटका दिला आहे. इम्रान यांना 50 हजारांचा दंड पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं (ECP) इम्रान यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करून खैबर पख्तुनख्वा (Khyber-Pakhtunkhwa) भागातील स्वात (swat) खोऱ्यात रॅली काढल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. इथं 31 मार्च रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. हे वाचा -  युद्धामुळे रशियातील सामान्य माणसाची हालत बिकट? साखरेसाठी कसे भांडताहेत पाहा लोक पंतप्रधानांव्यतिरिक्त अन्य 5 जणांनाही दंड पाकिस्तानातील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘डॉन’नं दिलेल्या माहितीनुसार, इम्रान यांच्याशिवाय आणखी 5 जणांवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. या लोकांमध्ये परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी, केंद्रीय दळणवळण मंत्री मुराद सईद, खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान, प्रांतीय मंत्री डॉ. अमजद अली आणि मोहिबुल्ला यांचा समावेश आहे. आयोगाच्या इशाऱ्यानंतरही या लोकांनी 16 मार्चला स्वात खोऱ्यात निवडणूक रॅली काढल्याचा आरोप आहे. हे वाचा -  रशियानं Instagram आणि Facebook वर घातली बंदी, सांगितलं हे कारण पंतप्रधानांनीच केलं नियमांचं उल्लंघन विशेष म्हणजे निवडणूक आयोगानं पंतप्रधान इम्रान खान यांना रॅली न घेण्याची नोटीसही बजावली होती. ही सूचना असूनही त्यांनी स्वात खोऱ्यातील रॅलीला संबोधित केलं. खरं तर, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या नवीन आचारसंहितेनुसार, सार्वजनिक पद धारण करणारी कोणतीही व्यक्ती निवडणूक होत असलेल्या जिल्ह्यांना भेट देऊ शकत नाही. खैबर-पख्तुनख्वामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा 31 मार्च रोजी होणार आहे. यासंदर्भात आयोगाकडून अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात