अमेरिका, 22 जानेवारी: भारतातच नाही तर जगातही पती पत्नींमध्ये वादावादी होत असल्याचे अनेक उदाहरण समोर आले आहेत. काही वेळी तर पती पत्नीमधील वाद विकोपाल जात असल्याचं पाहायला मिळतंय. येवढचं नाही तर काही पती-पत्नीमध्ये तुफान हाणामारी होतेय. मात्र अमेरिकेतील एका राज्यात चक्क महिलेनंच पती विकणे असल्याची जाहिरात फेसबुकवर पोस्ट केली आहे. पती विकण्याची जाहिरात सोशल मीडियावर आल्यानं त्यावर अनेक कमेन्ट आल्या आहेत. 111 डॉलर्सला पती विकण्याची फेसबुकवर पोस्ट अमेरिकेतील मिशिगन राज्यातील एका महिलेनं पती विकण्याची जाहिरात फेसबुकवर टाकली आहे. पती विकण्याची जाहिरात फेसबुक पोस्टवर वाचून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुक पोस्ट टाकून महिलेनं आपल्या पतीची किंमतही लावली आहे. केवळ 111 डॉलर्सला पती विकणे असल्याचं तीन जाहिरातीत म्हटलं आहे. पती विकण्याची पोस्ट का? अमेरिकेतील या महिलेनं पती विकण्याची जाहिरात का पोस्ट केली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं कारण ऐकून तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. महिलेनं एक पॅन्ट 199 डॉलर्सला विकत घेतली होती. ऑस्ट्रेलियाच्या डिझायनरकडून महिलेनं पॅन्ट तयार करून घेतली होती. मात्र महिलेच्या पतीनं पत्नीचे कपडे धुतले. धुतलेले कपडे सुकवण्यासाठी ड्रायरमध्ये टाकले. पण पत्नीच्या एक पॅन्टची साईज धुतल्यानंतर कमी झाली. जेव्हा महिलेनं पॅन्ट पाहिला आणि त्यानंतर तिची सटकली. पॅन्टची साईज कमी झाल्यानं तिनं पतीला खडे बोल सुनावले. पॅन्टकडे पाहून ती पॅन्ट चार वर्षाच्या मुलाची असल्याचं तिने पतीला सुनावलं. येवढचं नाही तर पतीला अनेक गोष्टी तीन सुनावल्या. पत्नी येवढ्यावरच थांबली नाही तर तीनं पती विकण्याची जाहिरातच फेसबुकवर पोस्ट केली आहे. पॅन्ट लहान झाल्यानं पतीचा संताप मशिगन राज्यातील फ्रीलँड शहरात हे जोडपं राहतं. गेल्या अनेक वर्षांपासून पती पत्नीची सर्व कामे करत असल्याचं सांगितलं जातं. त्या दिवशीही पतीनं पत्तीचे सारे कपडे धुतले. मात्र पत्तीनं ऑस्ट्रेलियाच्या एका डिझायनरकडून विकत घेतलेल्या पॅन्टची साईट धुतल्यामुळं कमी झाली. मग काय पत्नीचं डोकं फिरलं. पत्नीनं पतिला नको त्या गोष्टी सुनावल्या. ऑस्ट्रेलियातील डिझायनरकडून विकत घेतलेली पॅन्ट पतीमुळं वाया गेल्याचं दु:ख तिला पचलं नाही. फेसबुकवर पोस्ट पाहून अनेक महिलांच्या प्रतिक्रिया महिलानं पती विकण्याची पोस्ट फेसबुकवर टाकल्यानंतर त्यावर अनेक महिलांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. एका महिलेनं तर मी आजपासून पतीला माझे कोणतेही कपडे न धुण्यास सांगितलं आहे. तर दुसऱ्या एका महिलेनं तर मी माझा पती कपडे धुताना त्याच्याकडे लक्ष देत असल्याचं लिहलंय. येवढचं नाही तर एका महिलेनं पतीला विकू नका नाही तर तुम्ही अधिक अडचणीत याल असं लिहलं आहे. हेही वाचा- LIVE सामन्यातच कपलचा सुरू झाला रोमान्स, आधी केलं KISS आणि… ही कंपनी देणार 1 लाख लोकांना जॉब ऑफर! अट एकच - मंगळावर जाण्याची तयारी हवी VIDEO डोंगरावरून वाहतोय आगीचा धबधबा! काय आहे VIRAL VIDEO मागचं वास्तव?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.