कसं शक्य आहे? महिलेनं वापरलं होतं गर्भनिरोधक, तेच हातात घेऊन जन्माला आलं बाळ

कसं शक्य आहे? महिलेनं वापरलं होतं गर्भनिरोधक, तेच हातात घेऊन जन्माला आलं बाळ

महिलेनं केला होता गर्भनिरोधकाचा वापर, विचित्र पद्धतीनं झाला बाळाचा जन्म; पाहून डॉक्टरही झाले हैराण

  • Share this:

ताईपे, 15 जुलै : कधी कधी अशा बातम्या समोर येतात, ज्यांच्यावर विश्वासही बसत नाही पण त्या खऱ्या असतात. तैवानमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे. तैवानमध्ये एका मुलाचा जन्म झाला. मात्र त्याच्या जन्मानंतर डॉक्टर हादरले. कारण या बाळाच्या हातात त्यांना गर्भनिरोधक (IUD) होते. महिलेने काही वर्षांपूर्वी गर्भधारणा टाळण्यासाठी IUDचा वापर केला होता. भारतात, कॉपर-टी म्हणून हे ओळखले जाते आणि काही वर्षांपासून गर्भधारणा टाळण्यासाठी स्त्रिया याचा वापर करतात. या मुलाचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

द सनच्या एका वृत्तानुसार गर्भ निरोधक कसे फेल झाले, यापेक्षा नवजात बालकाच्या हातात कसे आले, यावर चर्चा सुरू आहे. या मुलाचा जन्म गेल्या आठवड्यात तैवानच्या हैफोंग शहरातील हाय फोंग आंतरराष्ट्रीय रुग्णालयात झाला होता. डॉक्टरांनी सांगितले की जेव्हा या मुलाचा जन्म झाला तेव्हा त्यांना त्यांच्या हातात काही तरी असल्याचे आढळले. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार हे पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी जेव्हा त्या महिलेला याबद्दल विचारले तेव्हा तिने कबूल केले की गर्भधारणा टाळण्यासाठी तिने IUD चा वापर केला होता.

वाचा-हनीमूनसाठी जमवले होते 6 लाख, होणाऱ्या नवऱ्याने न सांगता खरेदी केला गेमिंग पीसी

वाचा-राम गोपाल वर्माच्या नवीन 'हिरो-हिरॉइन'चे इंटिमेट PHOTOS, दिग्दर्शक पुन्हा चर्चेत

व्हायरल झाला बाळाचा फोटो

डॉक्टरांनी दिलेल्या महितीनुसार, गर्भनिरोधक यंत्राचा वापर मुलाचा जन्म रोखण्यासाठी करण्याच आला, मात्र पहिल्यांदाच असा प्रकार घडला. त्यामुळे मी या मुलाचा फोटो काढला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या मुलाला miracle baby असे नाव नेटकऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, या बाळाच्या आईने तिने 2 वर्षापूर्वी गर्भनिरोधक यंत्र वापरल्याचे सांगितले.

वाचा-ब्रेस्ट सर्जरीनंतर 'या' खेळाडूला अचानक झाला त्रास, उचलावं लागलं टोकाचं पाऊल

Published by: Priyanka Gawde
First published: July 15, 2020, 10:46 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading