केवळ चित्रपटातील अभिनेत्रीच नाही तर WWEच्या महिला कुस्तीपटूही ब्रेस्ट सर्जरी (Breast Surgery) करतात. त्यापैकी एक महिला कुस्तीपटू शेरलट फ्लेअर(Charlotte Flair).
शेरलट फ्लेअर ही तब्बल 10 वेळा WWE महिला चॅम्पियनशिप जिंकलेली खेळाडू आहे. मात्र एका मॅचदरम्यान अचानक शेरलटला त्रास झाला आणि त्यानंतर ती पुन्हा ती WWE खेळली नाही.
शेरलट फ्लेअरने अचानक ब्रेक घेतल्यावर सर्वांनाच धक्का बसला. कारण तिला कोणतीही दुखापत झाली नव्हती.
शेलटच्या दुखपतीवर चर्चा झाल्यानंतर तिनं स्वत: सांगितले आहे की ब्रेस्ट सर्जरीमुळे तिने हा ब्रेक घेतला आहे. ती पुन्हा रिंगमध्ये उतरून खेळणार असल्याचे सांगितले.
2018मध्ये शेरलटने ब्रेस्ट ट्रान्सप्लंट केल्याची माहिती दिली होती. याचे कारण होते, सिलिकॉन पॉयझनिंग. शेरलेटच्या स्तनात सिलिकॉन पॉयझनिंग झाल्यामुळे तिला ही शस्त्रक्रीया करावी लागली होती.
मुख्य म्हणजे शेरलेट ही एक महान खेळाडू आहे आणि ती दिग्गज कुस्तीपटू रिक फ्लेअर यांची मुलगी आहे.
शेरलोटने तिच्या चाहत्यांना वचन दिले आहे की ब्रेस्ट सर्जरीनंतर ती पुन्हा रिंगमध्ये परत येईल.