हनीमूनसाठी जमवले होते 6 लाख, होणाऱ्या नवऱ्याने न सांगता खरेदी केला गेमिंग पीसी

हनीमूनसाठी जमवले होते 6 लाख, होणाऱ्या नवऱ्याने न सांगता खरेदी केला गेमिंग पीसी

एका व्यक्तीने चक्क त्याच्या हनीमूनसाठी जमवलेले सारे पैसे गेमिंग पीसी खरेदी करण्यासाठी खर्च केले आहेत. थोडेथोडके नव्हे तर जवळपास 6 लाख रुपये या व्यक्तीने खर्च केले आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : गेमिंगच्या आहारी गेलेले अनेकजण असतात. दिवसरात्र मोबाईल-लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून अनेकांचे गेम खेळणे सुरू असतं. मात्र एका व्यक्तीने चक्क त्याच्या हनीमूनसाठी जमवलेले सारे पैसे गेमिंग पीसी खरेदी करण्यासाठी खर्च केले आहेत. थोडेथोडके नव्हे तर जवळपास 6 लाख रुपये या व्यक्तीने खर्च केले आहे.

इंडिया टाइम्सच्या बातमीनुसार ही माहिती एका रेडिट युजरने शेअर केली आहे. रेडिटवर R/relationship_advice subreddit वर बोलताना या महिलेने तिची व्यथा मांडली. तिने अशी माहिती दिली आहे की, गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. जानेवारीपासून त्यांनी दर महिन्याला पैसे साठवण्यास सुरूवात केली होती. आतापर्यंत जवळपास दोघांनी 8000 डॉलर सेव्ह केले होते. याचदरम्यान तिच्या होणाऱ्या नवऱ्याने गेमिंग पीसी खरेदी करण्याबाबत तिला विचारले. तेव्हा तिने त्याला मनाई केली होती.

(हे वाचा-रस्त्यावर बसून वाघाने मारली डरकाळी, गाडीतील लोकांची झाली अशी अवस्था; पाहा VIDEO)

तिने पुढे असं लिहिलं आहे की, आठवड्याने तो पीसी घेऊन आला. त्याकरता लागणारे टेबल-खुर्ची देखील घेऊन आला. जेव्हा त्याला विचारलं की, एवढे पैसे कुठून आले तर त्याने घाबरत घाबरत घडला प्रकार सांगितला. तिने रेडिटवर शेअर केलेल्या या पोस्ट आतापर्यंत 9 हजार कमेंट्स आल्या आहेत. तिची ही पोस्ट रेडिटवर खूप व्हायरल झाली आहे. तिने या पोस्टमध्ये त्याच्या गेम खेळण्याबाबत तक्रार देखील केली आहे. तसंच त्याचा पीसी जाळून टाकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या मुलीला अशी भीती आहे की, तो गेमिंगपायी हातची नोकरी देखील घालवून बसेल.

या महिलेने केलेल्या पोस्टनुसार तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या बेस्ट फ्रेंडने गेमिंग कम्प्यूटर घेतल्यानंतर त्याचीही हा पीसी घेण्याची इच्छा तीव्र झाली आणि त्याने हनीमूनसाठी जमवलेला सर्व पैसा खर्च केला. दरम्यान तिच्या होणाऱ्या नवऱ्याने हा सर्व पैसा पुन्हा कमावण्याचे आश्वासन त्याने तिला दिलं आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 15, 2020, 10:20 AM IST
Tags: Viral

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading