Home » photogallery » entertainment » RAM GOPAL VERMAS THRILLER WEB SERIES HERO ROCK KACHCHI AND HEROINE APSARA RANI SIZZLING PHOTOSHOOT SHARED BY DIRECTOR MHJB
राम गोपाल वर्माच्या नवीन 'हिरो-हिरॉइन'चे इंटिमेट PHOTOS, दिग्दर्शक पुन्हा चर्चेत
दिग्दर्शक राम गोपाल वर्माने त्याची नवीन सीरिज 'थ्रीलर'साठी 'ओडिशा टॅलेंट' शोधले आहे. त्यांचे हॉट फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे.
|
1/ 7
राम गोपाल वर्माच्या नवीन वेब सीरिज 'थ्रीलर' मध्ये ओडिशामधील दोन कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. त्यांचे काही हॉट फोटो दिग्दर्शकाने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत
2/ 7
अप्सरा रानी (Apsara Rani) आणि रॉक कच्छी (Rock Kachchi) हे ओडिशामधील कलाकार राम गोपाल वर्माच्या नवीन सीरिजमध्ये दिसणार आहेत.
3/ 7
हे सिझलिंग फोटो शेअर करताना त्याने दोन्ही कलाकारांबद्दल ट्विटरवर भरभरून कौतुक करणारे शब्द लिहिले आहेत. अप्सरा रानीचे त्याने विशेष कौतुक केले आहे.
4/ 7
अप्सरा रानीने याआधी 'Four Letters' या तेलुगू चित्रपटात काम केले असून ती हैदराबादची राहणारी आहे. तर रॉकला मिळालेला हा पहिलाच ब्रेक आहे.
5/ 7
अप्सरा रानीचे मुळ नाव अंकिता महाराणा आहे. तिने मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या सीरिजनंतर रॉकचा देखील आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याने राम गोपाल वर्माचे मनापासून आभार मानले आहेत.
6/ 7
सिल्क स्मिताचा आदर्श ठेवून अंकिताने तिचे नाव अप्सरा रानी करून घेतले. दरम्यान या फोटोशूटनंतर अप्सरा आणि रॉक दोघेही चर्चेत आले आहेत.
7/ 7
अनेक नेटिझन्सनी या फोटोशूटनंतर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र हे फोटोशूट सध्या खूप व्हायरल होत आहे.