इंडोनेशिया, 15 सप्टेंबर : इंडोनेशियाच्या पूर्व जावामधील ग्रेसीक रेजन्सी याठिकाणी मास्क घालण्यास नकार देणाऱ्यांना दफन भूमीत खोदकाम करण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जकार्ता पोस्टच्या एका रिपोर्टनुसार मास्क न घालणाऱ्या नागरिकांना शिक्षा म्हणून इंडोनेशियातील जावा येथील अधिकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला आहे. Ngabetan गावात या लोकांना सार्वजनिक दफन भूमीत मृतदेह पुरण्यासाठी खोदकाम करण्यास सांगण्यात आले. आतापर्यंत 8 जणांना ही शिक्षा देण्यात आली. ज्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे अशा लोकांचे मृतदेह दफन करण्याची ही शिक्षा आहे.
खोदकामासाठी माणसे कमी असल्याने आम्ही असे केल्याचे सेरेमेचे जिल्हा प्रमुख सुयोनो यांनी म्हटले आहे. दोन लोकांना खोदण्याची तर एकाला आतील लाकडी फळीत छिद्रे पाडण्याचे काम देण्यात आल्याचे त्याने सांगितले. नागरिक यामुळे तरी प्रतिबंधात्मक उपाय स्वीकारतील अशी अपेक्षा सुयोनो यांनी व्यक्त केली आहे. याठिकाणी कोव्हिडची पहिली केस सापडल्यानंतर चिंता व्यक्त करण्यात येत होती. वाढत्या संसर्गाने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
(हे वाचा-COVID-19: मित्रांसोबत केली बेधुंद पार्टी, 9 लाखांचा दंड होताच नशाच उतरली)
रेजेन्ट कायद्या 22/2020 नुसार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला दंडाची किंवा सार्वजनिक सेवेची शिक्षा देण्यात येऊ शकते. इंडोनेशियात रविवारी सलग सहाव्या दिवशी 3 हजार नवीन रुग्ण समोर आले आहेत. दक्षिण आशियातील अधिक लोकसंख्या असलेल्या देशाने सोशल डिस्टंसिय नव्याने लागू करण्यासाठी कंबर कसली आहे. देशभरात रविवारी 73 मृत्यू आणि 3636 नवीन रुग्ण आढळले आहेत. रॉयटर्स या वृत्त्तसंस्थेनुसार येथे 2 लाख 18 हजार 382 रुग्ण असून 8 हजार 723 लोकांचा मृत्यू झाला आहे.
(हे वाचा-भीषण अपघात गाडीचा झाला चक्काचूर, लोकांना बाहेर काढण्यासाठी आलं हेलिकॉप्टर)
जकार्ता येथे वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. सोमवारपासून हा नियम लागू झाला असून सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्याची मुभा आहे. शॉपिंग सेंटर अर्ध्या लोकांच्या उपस्थिती तर हॉटेल्समध्ये केवळ पार्सल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.