होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
1/ 6


कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळा, सरकारच्या नियमांचं पालन करा असं वारंवार सांगितलं जातं मात्र या नियमांचं उल्लंघन करणं ब्रिटनच्या एका युवकाला चांगलच महागात पडलं.
2/ 6


या 19 वर्षांच्या तरूणाने आपल्या मित्रांसोबत घराच्या आवारात पार्टी केली होती. त्या पार्टीला तब्बल 50 मित्र उपस्थित राहिले. त्यामुळे नियमांचं उल्लंघन झाल्याने या तरूणाला पोलिसांनी दंड ठोठावला.
3/ 6


ब्रिटनमधल्या नॉटिंघम मधलं हे प्रकरण आहे. पोलिसांना माहीती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि पार्टी बंद करायला सांगितलं. त्यानंतर आयोजक म्हणून त्या तरूणाला 9.4 लाखांचा दंडही ठोठावला.
5/ 6


ब्रिटनमध्ये फक्त 6 लोकांनाच एकत्र येण्याची मुभा आहे. या तरूणांनी नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे