इस्लामाबाद, 14 मे : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) सातत्यानं लष्कर आणि शरीफ सरकारविरोधात बोलत आहेत. चोरांच्या हातात सत्ता देण्यापेक्षा देशावर अणुबॉम्ब (drop atom bomb on pakistan) टाकला असता तर बरं झालं असतं, असं इम्रान यांनी म्हटलं आहे. या चोरट्यांनी सत्तेत आल्यानंतर प्रत्येक संस्था आणि न्यायव्यवस्था उद्ध्वस्त केली आणि आता या गुन्हेगारांची चौकशी कोणता अधिकारी करणार असा सवाल त्यांनी केला. इम्रान खान आपल्या बेताल वक्तव्यांनी देशातील संस्थांना लक्ष्य करून पाकिस्तानी जनतेच्या मनात विष पेरत आहेत, असं पंतप्रधान शाहबाज शरीफ (Prime Minister Shahbaz Sharif) यांनी म्हटले आहे. सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अत्यंत अस्वस्थ झाले आहेत. ते सातत्याने लष्कर आणि शरीफ सरकारविरोधात बोलत आहेत. चोरांच्या हातात सत्ता देण्यापेक्षा देशावर अणुबॉम्ब टाकला असता तर बरं झालं असतं, असं वक्तव्य आता त्यांनी केलंय. खान यांनी शुक्रवारी बनिगाला निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना हे धक्कादायक विधान केलं. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इम्रान म्हणाले, ‘या चोरांनी सत्तेत आल्यानंतर प्रत्येक संस्था आणि न्यायालयीन यंत्रणा उद्ध्वस्त केली आणि आता या गुन्हेगारांविरुद्ध कोणता अधिकारी तपास करणार असा सवाल आहे.’ इम्रान खान आपल्या बेताल शब्दांनी देशातील संस्थांना लक्ष्य करून पाकिस्तानी जनतेच्या मनात विष पेरत आहेत, असं पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. हे वाचा - 14 वर्षांच्या मुलाला 10 मिनिटांत ठरवलं दोषी आणि दिला मृत्यूदंड! 70 वर्षांनी समोर आलं सत्य
देशात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून नॅशनल असेंब्लीच्या पहिल्या नियमित अधिवेशनादरम्यान पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, “इम्रान खान यांनी वारंवार तत्कालीन विरोधकांना आणि आता सरकारमधील लोकांना चोर आणि डाकू म्हटल्यामुळे देशाचे तुकडे झाले आहेत.”
‘माझ्या सरकारविरोधात सातत्यानं षडयंत्र रचलं’ इम्रान खान यांनी दावा केला होता की, त्यांना गेल्या वर्षी जूनमध्येच त्यांच्या सरकारविरोधात रचल्या जात असलेल्या कटाची माहिती मिळाली होती. त्यांचं सरकार कमकुवत करण्यासाठी सातत्यानं निर्णय घेतले गेले. हे वाचा - 13 वर्षांचा मुलगा 66 दिवस घरात एकटाच राहिला आणि चमत्कार घडला, घडलं असं काही…
पीटीआय अध्यक्षांनी शाहबाज शरीफ यांच्या सरकारला इशारा दिला होता की, 20 मे रोजी लाँग मार्च दरम्यान राजधानी इस्लामाबादमध्ये प्रवेश करण्यापासून कोणतीही शक्ती त्यांना रोखू शकत नाही.
त्यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग नवाजच्या नेतृत्वाखालील सरकारला इशारा दिला आहे की, 20 लाखांहून अधिक लोक खरं स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि आयात केलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी इस्लामाबादमध्ये पोहोचतील. पाकिस्तानचं सध्याचं सरकार त्यांच्या धाडसीपणाला घाबरतं. त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी 11 पक्षांची मदत घेण्यात आल्याचं इम्रान यांनी म्हटलं आहे.