Home /News /videsh /

14 वर्षांच्या मुलाला 10 मिनिटांत ठरवलं दोषी आणि दिला मृत्यूदंड! 70 वर्षांनी समोर आलं सत्य

14 वर्षांच्या मुलाला 10 मिनिटांत ठरवलं दोषी आणि दिला मृत्यूदंड! 70 वर्षांनी समोर आलं सत्य

अमेरिकेतील साउथ कॅरोलिनामध्ये 14 वर्षीय जॉर्ज स्टिनीला न्यायालयाने 10 मिनिटांत गुन्हेगार घोषित केले आणि त्याला फाशीची शिक्षाही सुनावली. पण न्यायासाठी लढताना कुटुंबाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी 70 वर्षे लागली. जॉर्जला 1944 मध्ये दोन गोर्‍या मुलींच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 12 मे : एका 14 वर्षांच्या मुलाला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि तेही कोणत्याही पुराव्याशिवाय. अवघ्या 10 मिनिटांत त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि पुढच्या दोन महिन्यात त्याला मृत्यूदंड देण्यात आला. मात्र, त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबीयांनी त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी 70 वर्षे संघर्ष केला. जॉर्ज स्टिनी असं या मुलाचं नाव असून त्याच्या  मृत्यूनंतरही खूप मोठ्या विलंबाने त्याला न्याय मिळाला आहे. यामुळे जॉर्ज परत येणार नसला तरी त्याच्या कुटुंबाला शांती आणि समाजात सन्मान नक्कीच मिळणार आहे. त्यांना जॉर्जवर झालेला अन्याय आणि त्याच्यावर लागलेला हत्येचा कलंक वर्षानुवर्षे छळत होता. सौ.इंटरनेट- 1991 ची टीव्ही फिल्म कॅरोलिना स्केलेटनने 14 वर्षांच्या जॉर्जसोबत घडलेल्या भयानक घटनेला पुन्हा एकदा पडद्यावर लोकांसमोर आणलं
  सौ.इंटरनेट- 1991 ची टीव्ही फिल्म कॅरोलिना स्केलेटनने 14 वर्षांच्या जॉर्जसोबत घडलेल्या भयानक घटनेला पुन्हा एकदा पडद्यावर लोकांसमोर आणलं
  पुराव्याशिवाय, साक्षीशिवाय, वकिलाशिवाय खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवलं अमेरिकेतील साऊथ कॅरोलिनामध्ये आफ्रिकन-अमेरिकन जॉर्ज स्टिनी याला 1944 मध्ये दोन गोर्‍या मुलींच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. 1944 हा काळ होता जेव्हा दक्षिण अमेरिकेतील गोरे-काळे संघर्ष शिगेला पोहोचला होता. दरम्यान, दोन गोऱ्या किशोरवयीन मुली एका खंदकात मृतावस्थेत आढळल्या. त्यानंतर संपूर्ण शहरात घबराट पसरली. बेटी जून बिनिकर (वय 11) आणि मेरी एम्मा थेम्स (वय 7) दोघीही फुलं शोधण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. यादरम्यान जॉर्ज आपल्या बहिणीसोबत घराबाहेर उभा असल्याचं दिसलं. त्यानंतर काही वेळ त्या मुलींनी त्याच्याशी याविषयी चर्चा केली. या संभाषणाने जॉर्जच्या आयुष्यात काळाची छाया पडली. दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलींचे मृतदेह खंदकात सापडले. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नसून डोक्यावर वार करण्यात आले होते. जॉर्ज शेवटचा त्या मुलींशी बोलताना दिसला होता. फक्त याच आधारावर त्याच्यावर कोणताही पुरावा, वकील आणि कुटुंबीय यांच्याशिवाय 10 मिनिटांत हत्येचा गुन्हा सिद्ध झाला. जॉर्जने आपला गुन्हा कबूल केल्याचं सांगण्यात आलं. पण त्या काळात कृष्णवर्णीयांच्या लढाईत त्यांच्या कुटुंबीयांना बळी जाण्यापासून वाचवण्यासाठी त्यानं असं केल्याचं कुटुंबीयांचं मत आहे. सौ. इंटरनेट- कोणत्याही पुराव्याशिवाय, साक्षीदारांशिवाय, वकिलाशिवाय जॉर्जला दोन लहान मुलींच्या खुनासाठी दोषी ठरवण्यात आलं. त्याला मृत्यूदंड दिल्याच्या 70 वर्षांनंतर न्याय मिळाला आणि निर्दोष सिद्ध करण्यात आलं. यानंतर त्याच्या बहिणीला अश्रू अनावर झाले.
  सौ. इंटरनेट- कोणत्याही पुराव्याशिवाय, साक्षीदारांशिवाय, वकिलाशिवाय जॉर्जला दोन लहान मुलींच्या खुनासाठी दोषी ठरवण्यात आलं. त्याला मृत्यूदंड दिल्याच्या 70 वर्षांनंतर न्याय मिळाला आणि निर्दोष सिद्ध करण्यात आलं. यानंतर त्याच्या बहिणीला अश्रू अनावर झाले.
  घटना घडल्यापासून अवघ्या 83 दिवसांत झाली शिक्षा 24 एप्रिल रोजी 10 मिनिटांत गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, त्यानंतर दोन महिन्यांत त्याला 16 जूनला फाशी देण्यात आली. त्याच्या अटकेनंतर कुटुंबीयांनी त्याला एकदाच पाहिलं. असं म्हणतात की, जॉर्ज त्यावेळी इतका लहान होता की, तो मृत्यूदंड देण्याच्या खुर्चीवरही फिट होऊ शकत नव्हता. (अमेरिकेत खुर्चीवर बसवून विजेचा शॉक देऊन मृत्यूदंड दिला जातो) त्याच्या पायांना इलेक्ट्रोड्स लावणंही कठीण जात होतं. तसंच, या शिक्षेत चेहऱ्यावर लावला जाणारा मास्कही त्याच्या चेहऱ्यापेक्षा खूप मोठा होता. 20 व्या शतकात, जॉर्ज हा अमेरिकेत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेलेला सर्वात लहान व्यक्ती होता. दुसरीकडे, जॉर्जची बहीण कॅथरीनने हार मानली नाही. तिने भावाच्या मृत्यूनंतरही त्याला न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घ संघर्ष केला. अपिलाच्या सुनावणीत तिनं त्याच्या बाजूने साक्ष दिली आणि सांगितलं की, घटनेच्या वेळी ती तिच्या भावासोबत होती. जॉर्जचा पुतण्या डेव्हिड स्टाउटने या दुःखद कथेचं पुस्तकात रूपांतर केले आणि 1991 च्या कॅरोलिना स्केलेटन या चित्रपटाला त्यातूनच प्रेरणा मिळाली.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: America, Death Sentence

  पुढील बातम्या