मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पाकसाठी दुष्काळात तेरावा महिना! आता फेसबुक, ट्विटर, गुगलची इमरान खान यांना थेट धमकी

पाकसाठी दुष्काळात तेरावा महिना! आता फेसबुक, ट्विटर, गुगलची इमरान खान यांना थेट धमकी

शांततेसाठी पुढे येण्याच्या दृष्टीने इम्रान खान म्हणाले की आम्ही पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करू. यासाठी लष्कराचे पाकिस्तान सरकारला सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शांततेसाठी पुढे येण्याच्या दृष्टीने इम्रान खान म्हणाले की आम्ही पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करू. यासाठी लष्कराचे पाकिस्तान सरकारला सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

एकीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला गेली असातान आता पंतप्रधान इमरान खान यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

  • Published by:  Priyanka Gawde
कराची, 29 फेब्रुवारी : एकीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला गेली असातान आता पंतप्रधान इमरान खान यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पाकिस्तानला फेसबुक, ट्विटर आणि गुगलसह अनेक कंपन्यांनी धमकी दिली आहे. परिस्थिती एवढी चिघळली आहे की, या सर्वांनी पाकला जगापासून तोडण्याची तयारी केली आहे. पाकिस्तानने काही महिन्यांपूर्वी फेसबुक, गुगल, ट्विटर यांसारख्या कंपन्यांवर सेन्सॉरशीप कायदा लागू केला होता. मात्र आता या कंपन्यांनी पाकिस्तानच्या डिजिटल सेन्सॉरशिप कायद्याबद्दल नाराजी व्यक्त करत सरकारला इशारा दिला आहे. वाचा-पाकचा वेडेपणा तर बघा, आता संसदेत सुरू करणार ब्युटी पार्लर पाकिस्तानमध्ये सोशल मीडियांना लागू असलेल्या नवीन नियमांमुळे फेसबुक, गुगल, ट्विटर यांचा युझर कमी झाला. त्याचबरोबर या नवीन कायद्यांमुळे पाकमध्ये या सेवा सुरू ठेवणे अवघड होत आहे. त्यामुळं आशिया इंटरनेट कोलिशन (AIC) यांनी इमरान खान सरकारला पत्र लिहून नियमात बदल करण्याचे आवाहन केले आहे. वाचा-दिल्ली : निर्दयीपणाचा बळी! मारहाण होत असताना राष्ट्रगीत गाणाऱ्या तरूणाचा मृत्यू सरकारचे सर्व नियम फसवे न्यूज एजन्सी न्यूज इंटरनेशनलच्या म्हणण्यानुसार या कंपन्यांचे म्हणणे आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एखाद्याच्या गोपनीयतेशी संबंधित तक्रारींमुळे सरकारने योग्य ती पावले उचलली नाहीत. ऑनलाइन सामग्रीसाठी आधीच कडक नियम आहेत. हे नियम अस्पष्ट आणि मनमानी आहेत असेही पत्रात पुढे लिहिले आहे. हे सर्व नियम पाकिस्तानच्या 7 कोटी इंटरनेट वापरकर्त्यांच्या गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करतात. त्यामुळं यात बदल न झाल्यास पाकमधील सर्व सेवा बंद करण्यात येतील, अशी धमकीही पाकला देण्यात आली आहे. वाचा-बापरे ! कुत्र्यालाही झाला 'कोरोना', माणसांमार्फत प्राण्यांमध्ये पसरतोय व्हायरस काय आहे पाकिस्तानचा डिजिटल सेन्सॉरशीप कायदा? पाकिस्तानमध्ये बनवलेल्या डिजिटल सेन्सॉरशीप कायद्यात, आक्षेपार्ह पोस्टबाबत कोणतेही स्पष्ट प्रमाण निश्चित केलेले नाही. काहीही आक्षेपार्ह मानले जाऊ शकते आणि त्याविरूद्ध अपील देखील केले जाऊ शकते. इतकेच नाही तर या कंपन्यांना अपीलच्या 24 तासांच्या आत पोस्ट काढून टाकावी लागेल आणि या कालावधीची मर्यादा केवळ 6 तास असेल. या व्यतिरिक्त, जो आक्षेपार्ह पोस्टबद्दल तक्रार करेल, त्याचे नावही गुप्त ठेवले जाईल. तर हा कायदा तोडणाऱ्याविरोधात 50 कोटी रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळेच या कंपन्यांनी इमरान खान सरकराला यांना सरकारला पत्र लिहिले आहे. यावर सरकार काय प्रतिक्रिया देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
First published:

Tags: Imran khan, Pakistan

पुढील बातम्या