पाकचा वेडेपणा तर बघा, आता संसदेत सुरू करणार ब्युटी पार्लर

पाकचा वेडेपणा तर बघा, आता संसदेत सुरू करणार ब्युटी पार्लर

पाकिस्तानला सध्या भिकेचे डोहाळे लागले आहे, कारण या देशाची अर्थव्यवस्था सध्या डबघाईला गेली आहे.

  • Share this:

कराची, 29 फेब्रुवारी : पाकिस्तानला सध्या भिकेचे डोहाळे लागले आहे, कारण या देशाची अर्थव्यवस्था सध्या डबघाईला गेली आहे. काही लोक एका वेळेच्या अन्नासाठी तळमळत आहेत पण देशातील पंतप्रधान आणि खासदारांना याचे काही गांभीर्य नाही. पाकिस्तानच्या संसद संकुलासाठी अशी घोषणा करण्यात आली आहे, जी कदाचित तेथील लोकांनाही चकित करेल.

पाकिस्तानच्या संसद परिसरात महिला खासदारांसाठी ब्युटी पार्लर खुले करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिनेटच्या समितीने इस्लामाबादच्या सर्वोच्च नागरी एजन्सीला संसदीय गृहनिर्माण संकुलात ब्युटी पार्लर सुरू करण्यास सांगितले आहे. आयएनएसने पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्ताचा संदर्भ देताना ही माहिती दिली. हा निर्णय महिला खासदारांच्या उपस्थित घेण्यात आला. संसद भवन संकुलात सिनेट गृहनिर्माण समितीची बैठक झाली आणि या बैठकीत महिला खासदारांसाठी ब्युटी पार्लर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा-मोठी बातमी, मुस्लीम आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा

इतकेच नव्हे तर महिला खासदारांच्या सूचना असूनही संसद लॉजमध्ये ब्युटी पार्लर का उघडले नाही यासाठी समितीने भांडवल विकास प्राधिकरणास (CAD) फटकारले आहे. हे आदेश देणाऱ्या समितीला सीडीएचे अध्यक्ष सलीम मंडीवाला यांनी सीडीएकडून या विषयावर ज्यांची नावे देण्यात आली आहेत अशा दोन महिला खासदारांशी चर्चा करून या विषयावर प्राधान्याने तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाने सर्वांना चकित केले आहे.

वाचा-विमानात असं काही घडलं की क्रू मेंबर्ससह सगळेच म्हणाले 'कबुतर जा जा', पाहा VIDEO

एकीकडे पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहचली आहे तर अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट आहे. 2007-08च्या सुरुवातीच्या काळात पाकिस्तानमध्ये महागाईचा 17 टक्क्यांवर पोहोचला होता. जानेवारीत पाकिस्तानात महागाईने गेल्या 12 वर्षांचा विक्रम मोडला, जेव्हा त्याचा दर वाढून 14.6 टक्के झाला. खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत इमरान यांना ब्यूटी पार्लर सुरू करण्याचा विचार येतोच कसा, असा सवाल पाक नागरिक विचारत आहे.

वाचा-नवी मुंबईत राजकीय खळबळ, शिवसेना नेते विजय चौगुले यांना जीवे मारण्याची धमकी

First published: February 29, 2020, 1:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading