मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बापरे ! कुत्र्यालाही झाली 'कोरोना'ची लागण, माणसांमार्फत प्राण्यांमध्ये पसरतोय व्हायरस

बापरे ! कुत्र्यालाही झाली 'कोरोना'ची लागण, माणसांमार्फत प्राण्यांमध्ये पसरतोय व्हायरस

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

हाँगकाँगमध्ये (Hong Kong) कुत्र्याला कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे, माणसांमार्फत प्राण्यांना व्हायरसची लागण झाल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे.

  • Published by:  Priya Lad
हाँगकाँग, 29 फेब्रुवारी : अनेक व्यक्तींना कोरोनाव्हायरसची (Coronavirus)  लागण झाली आहे, कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र हाँगकाँगमध्ये (Hong Kong) असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे डॉक्टरही हैराण झाले. एका व्यक्तीमुळे त्याच्या कुत्र्याला कोरोनाव्हायरस झाला आहे. पोमेरिनियन  (Pomeranian) जातीचा हा कुत्रा आहे. यवोन चाऊ हो यी (Yvonne Chow Hau Yee) आपल्या आजारी कुत्र्याला डॉक्टरांकडे घेऊ गेले. डॉक्टरांनी त्याच्या नाक आणि तोंडातील लाळेचे नमुने घेतले, तेव्हा या कुत्र्याला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं समजलं. 14 दिवस या कुत्र्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. हेदेखील वाचा - तुम्हीही असू शकता कोरोनाव्हायरसचे Super spreader! विषाणू वेगाने पसरायचं भयंकर कारण आलं पुढे मेट्रो युकेच्या रिपोर्टनुसार, अग्रीकल्चर, फिशर आणि कन्जर्व्हेशन डिपार्टमेंटने (एएफसीडी) या कुत्र्याच्या नियमित तपासणीसे आदेश दिले. एएफसीडी सांगितलं की, मालकाकडून प्राण्याला व्हायरसची लागण झाल्याचं हे पहिलं प्रकरण असावं. मात्र पाळीवर पाळीव प्राण्यालाही कोविड-19 (Covid 19) व्हायरसची लागण होऊ शकते आणि त्यांच्यामार्फत माणसांमध्ये हा आजार पसरू शकतो, हे ठोसपणे सांगणं अशक्य आहे. दक्षिण कोरियात (South korea) व्हायरस झपाट्यानं पसरतो आहे. व्हायरसची आणखी 594 नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर आता कोरोनाव्हायरसग्रस्त रुग्णांची संख्या शनिवारी 2,931 झाली आहे. रोग नियंत्रण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 90 टक्केपेक्षा जास्त प्रकरण दाएगू (Daegu) शहरातील आहेत. आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण शिनचोनजी चर्च ऑफ जीससच्या 2,10,000 पेक्षा अधिक सदस्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. दक्षिण कोरियातील व्हायरसची सर्वाधिक प्रकरणं या चर्चशी संबंधित आहे, त्यामुळे या ठिकाणाला केंद्रबिंदू मानलं जातं आहे. हेदेखील वाचा - Fact check : चिकन, अंडी खाल्ल्याने खरंच कोरोनाव्हायरस होतो का? चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे मृत होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 2,835 झाली आहे. तर 79,251 जणांना याची लागण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगानं ही माहिती दिली आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या