जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / इम्रान खान यांचंही 'लाव रे तो व्हिडीओ'! भर सभेत काय झालं पाहा

इम्रान खान यांचंही 'लाव रे तो व्हिडीओ'! भर सभेत काय झालं पाहा

इम्रान खान यांचंही 'लाव रे तो व्हिडीओ'! भर सभेत काय झालं पाहा

पाकिस्तानबरोबरच स्वातंत्र्य मिळालेला भारत कठोर भूमिका घेऊन आपल्या जनतेच्या गरजेनुसार परराष्ट्र धोरण बनवू शकत असेल, तर पाकिस्तान सरकार का बनवू शकत नाही, असं इम्रान खान (Imran Khan) म्हणाले

  • -MIN READ
  • Last Updated :

कराची 15 ऑगस्ट : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं आहे. खान यांनी लाहोरमधील रॅलीदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा व्हिडिओ प्ले केला आणि भारताचं कौतुक केलं. इम्रान खान पाकिस्तानच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी एका रॅलीला संबोधित करत होते. यादरम्यान ते म्हणाले की, रशियाकडून स्वस्त तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेकडून सतत दबाव असतानाही जयशंकर यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहणं कौतुकास्पद आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधात लढण्यासाठी एकत्र या, लाल किल्ल्यावरून मोदींनी साधला काँग्रेसवर निशाणा एस जयशंकर यांनी स्लोव्हाकियाच्या ब्रातिस्लाव्हा फोरम येथे आयोजित एका कार्यक्रमात रशियन तेल विकत घेण्यावरून अमेरिकेला खडे बोल सुनावले होते. जयशंकर म्हणाले होते, की ‘जर युरोप रशियाकडून गॅस विकत घेऊ शकतो तर, भारत रशियाकडून तेल का विकत घेऊ शकत नाही’. जयशंकर यांचा हा व्हिडिओ रॅलीतील मोठ्या जनसमुदायाला दाखवल्यानंतर इम्रान खान यांनी जयशंकर यांचं कौतुक करत पाकिस्तान सरकारवर निशाणा साधला.

जाहिरात

रॅलीला संबोधित करताना खान म्हणाले, “भारताने रशियाकडून तेल खरेदी केलं कारण हा त्यांच्या लोकांच्या हिताचा निर्णय होता.” पाकिस्तानबरोबरच स्वातंत्र्य मिळालेला भारत कठोर भूमिका घेऊन आपल्या जनतेच्या गरजेनुसार परराष्ट्र धोरण बनवू शकत असेल, तर पाकिस्तान सरकार का बनवू शकत नाही.’ युवकांनो तिरंग्याची शपथ घेऊन पुढे जा! पंतप्रधानांनी सांगितलं पुढील 25 वर्षांचं महत्त्व भारताने अमेरिकेच्या दबावाला न झुगारता रशियाकडून स्वस्त तेल खरेदी केलं, असं खान म्हणाले. दरम्यान, पाकिस्तानच्या सत्तेतून बेदखल झाल्यानंतर इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे अनेकदा कौतुक केले आहे. आता त्यांचा हा नवा व्हिडिओही चर्चेत आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात