नवी दिल्ली, 28 एप्रिल : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रामायणावर (Ramayana) विशेष सत्राचे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे रामायणातून नेतृत्वगुण (Leadership) शिकण्यासाठी 2 आणि 3 मे रोजी जेएनयूमध्ये सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. याबाबत जेएनयूचे वीसी (Vice-Chancellor) एन जगदीश कुमार यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
जेएनयूचे वीसी एम. जगदीश कुमार यांनी सांगितले की, रामायणातून नेतृत्वगुण शिकण्यासाठी एका सेमिनारची आवश्यकता आहे. कारण महात्मा गांधी यांनी स्वत: सांगितलं आहे की, भगवान रामाहून महान कोणी नाही. राम निराकार आहेत. गांधीनी असं म्हटलं आहे. गांधीजी म्हणाले होते की, भगवान राम कठीण परिस्थितीत सत्य, न्याय आणि समानता आदी गुणांचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करतात. प्रो. एम जगदीश म्हणाले, आपण या कोरोनाच्या संकटात रामायणातून बरंच काही शिकू शकतो. मात्र या सेमिनारवर विद्यापीठातील काही जणांनी विरोध दर्शविला आहे.
JNU to conduct webinar on ‘Leadership lessons through Ramayana on May 2 and 3 from 4 p.m. to 6 p.m. and will be coordinated by Prof. Santosh Kumar Shukla, JNU and Prof. Mazhar Asif, JNU. https://t.co/nWoyLf2Qv5
— Mamidala Jagadesh Kumar (@mamidala90) April 28, 2020
Zoom वर सेमिनारचे आयोजन
देशातल लॉकडाऊन सुरू असल्याने जेएनयूचा हा कार्यक्रम झूम या (ZOOM APP) वर दाखविला जाणार आहे. हा कार्यक्रम लाइव्ह असल्याने विद्यार्थी सहज यात सहभागी होऊ शकतात. या कार्यक्रमाचे आयोजन जेएनयूमधील स्कूल ऑफ संस्कृत आणि इण्डिक स्टडीजचे प्रोफेसर संतोष कुमार शुक्ला आणि स्कूल ऑफ लॅग्वेज, लिटरेचर आणि कल्चरल स्टडीजचे प्रोफेसर मजहर आसिफ यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिर करा
एनएसयूआयने केला विरोध
जेएनयू प्रशासनाने आयोजित केलेल्या या सेमिनारवर एनएसयूआयने (NSUI) विरोध केला आहे. त्यांच म्हणणं आहे की अख्खं जग कोरोना सारख्या संकटाशी लढा देत आहे, अशावेळी चर्चा ही कोरोनासंबंधित व्हायला हवी. रामायण आणि लीडरशीपवर नाही. एनएससूआयने यामागे केंद्र सरकार आणि जेएनयचे वीसी यांनी एकत्रित आयोजन असल्याचा आरोप केला आहे. या कार्यक्रमाला प्रोपोगंडा म्हटलं आहे.
संबंधित-अवैध सलूनमुळे धोका वाढला, हेअर ड्रेसरला कोरोनाची लागण झाल्याने गावात खळबळ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: JNU