धारावी पोखरतोय कोरोना, 24 तासांत 42 रुग्ण; 4 जणांचा मृत्यू

धारावी पोखरतोय कोरोना, 24 तासांत 42 रुग्ण; 4 जणांचा मृत्यू

आतापर्यंत धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या 330 पर्यंत पोहोचली असून आतापर्यंत येथे 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 एप्रिल : राज्यातील मुंबई आणि पुण्यातील वाढत्या कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या ही चिंताजनक आहे. मुंबईतील संख्या तर दिवसेंदिवस वाढतच आहे. आजही केवळ धारावीत (Dharavi) 42 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज येथे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना (Covid -19) रुग्णांवर नियंत्रण आणणे पालिकेसमोरचं मोठं आव्हान आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत तब्बल 8 ते 10 लाख नागरिक राहतात. तेथील घरं अत्यंत लहान असल्याने लोक तेथे दाटीवाटीने राहतात. त्यामुळे धारावीत कोरोना शिरू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते. मात्र धारावीत पहिला रुग्ण आढळल्यानंतर त्यांचा फैलाव झपाट्याने झाला. आतापर्यंत धारावीतल कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 330 पर्यंत पोहोचली असून आतापर्यंत येथे 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

काहींच्या मते धारावीत कम्युनिरी संसर्ग पसरत चालला आहे. मात्र पालिकेकडून येथील रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रयत्न केला जात आहे. आज येथे 42 रुग्ण सापडले आहे. हे रुग्ण एकाच भागातील नसून विविध भागातील आहेत. त्यामुळे हा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. सध्या धारावीतील अनेक भागांमध्ये हॉटस्पॉट उभारले आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी ठिकठिकाणी अशा स्वरुपाच्या हॉटस्पॉटची आवश्यक व्यक्त केली जात आहे. दरम्यान देशात गेल्या 24 तासांमध्ये 1543 एवढे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 29,435 एवढी झालीय. तर रुग्ण बरे होण्याची प्रमाण वाढलं असून ते 23.3 टक्क्यांवर गेल्याची माहिती त्यांनी दिली. ही अत्यंत चांगली गोष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित-धक्कादायक! अ‍ॅम्ब्युलन्स नाही...मदत नाही...बापाला हातगाडीवर घेऊन धावत होता मुलगा

अवैध सलूनमुळे धोका वाढला, हेअर ड्रेसरला कोरोनाची लागण झाल्याने गावात खळबळ

 

 

First published: April 28, 2020, 7:48 PM IST

ताज्या बातम्या