मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

माझ्याकडे चप्पल बदलण्याचाही वेळ नव्हता, मी पैसे घेऊन पळालो नाही; अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांचं स्पष्टीकरण

माझ्याकडे चप्पल बदलण्याचाही वेळ नव्हता, मी पैसे घेऊन पळालो नाही; अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांचं स्पष्टीकरण

Afghanistan Ashraf Ghani: तालिबानी (Talibani) काबूलमध्ये पोहोचल्यानंतर देश सोडून निघून गेलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (Afghanistan president) अशरफ गनी  (President Ashraf Ghani)  यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Vichare

अबूधाबी, 19 ऑगस्ट: तालिबानी (Talibani) काबूलमध्ये पोहोचल्यानंतर देश सोडून निघून गेलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (Afghanistan president) अशरफ गनी (President Ashraf Ghani) यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्वतः लागलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. मी पैसे घेऊन पळालो नाही, असं गनी यांनी म्हटलं आहे.

गनी यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं की, ही आमच्या दोघांचं अपयश आहे की आमचं सरकार आणि तालिबा दोघे स्वतःच्या समाधानापर्यंत पोहोचलं नाही. जे म्हणत आहेत की मी पळून गेलो आहे, मात्र त्यांना वास्तव माहित नाही. जे म्हणताहेत की मी पैसे घेऊन पळून गेलो आहे. ते एकदम चुकीचं आहे. मी देशात असतो तर रक्तपात झाला असता.

जर मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असतो तर हिंसा आणि नासधूस झाली असती असं गनी यांचं म्हणणं आहे. गनीनं यांनी म्हटलं की, सुरक्षेच्या कारणास्तव देश सोडला आहे.

Alert! पुढील 3 ते 4 तास पावसाची शक्यता; 'या' 2 जिल्ह्यात मात्र जोर अधिक

मला तालिबानला शांततेच्या मार्गाने सत्ता द्यायची होती. पण माझ्या इच्छेविरुद्ध मला अफगाणिस्तानातून बाहेर पाठवण्यात आले. मला सांगण्यात आले की तालिबान काबूलमध्ये आहेत. तालिबानशी आमचा करार होता की ते काबूलमध्ये प्रवेश करणार नाहीत पण त्यांनी करार मोडला. मला राष्ट्राध्यक्ष म्हणून फासावर लटकायचं नव्हतं. कारण मी अफगाणिस्तानची प्रतिष्ठा होतो. मी मृत्यूला घाबरत नाही, असंही अशरफ गनी यांनी स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

अफगाणिस्तानला परतण्यासाठी इतरांचा सल्ला घेत असल्याचं म्हणत पैसे घेऊन पळालो असल्याच्या आरोपावर गनी यांनी म्हटलं की हे उघड खोटे आहे. यूएईच्या कस्टममध्ये याबाबत तुम्ही माहिती घेऊ शकता. माझ्याकडे चप्पल बदलण्याचाही वेळ नव्हता. माझ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मला ताबडतोब निघून जाण्यास सांगितले कारण मला राष्ट्राध्यक्ष म्हणून धोका होता.

यूएईमध्ये आहेत अशरफ गनी

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (Afghanistan president) अशरफ गनी (Ashraf Gani) सध्या युएईमध्ये (UAE) असून त्या देशानं गनींना सन्मानपूर्वक आसरा दिला आहे. युएईच्या परराष्ट्र मंत्रालयानं या बातमीची खातरजमा केली आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या संदेशानुसार, अशरफ गनी यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून आसरा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं युएईकडून जाहीर करण्यात आलं आहे.

PM Kisan: योजनेसाठी हे शेतकरी आहेत अपात्र, 2000 रुपयांचा लाभ मिळाला असल्यास परत घेतले जाणार पैसे

जागेबाबत गुप्तता

युएईमध्ये अशरफ गनींना नेमकं कुठं ठेवण्यात आलं आहे, याबाबत मात्र युएईकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. ते राजधानी अबूधाबीमध्ये असण्याची शक्यता काहीजणांनी व्यक्त केली असली तरी सुरक्षेची बाब म्हणून ही बाब उघड करण्यात आलेली नाही. अशरफ गनी यांना अनेक घटकांपासून जिवाला धोका उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड युएईकडून केली जात नसल्याचं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Afghanistan, Taliban